पुणे

आठ शहरांसाठी वाहतुकीसाठी लोहगाव विमानतळ सज्ज.... पण....

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशातंर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिल्यामुळे लोहगाव विमानतळावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. परंतु, राज्य सरकारने विमान वाहतूक सुरू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, याबाबत निर्माण झालेला तिढा कधी सुटणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे. लोहगाव विमानतळावरुन 8 शहरांसाठी सोमवारपासून विमान वाहतूक सुरू होणार होती. 

दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बंगळूरू, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, नाशिक या शहरांसाठी विमानतळ प्रशासनाने विमान वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. विमान वाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 22 मे रोजी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितल्यानुसार विमानतळावर तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. 

इंडिगो, स्पाईस जेट, एअर इंडिया या विमान कंपन्यांनी 25 मे पासूनच्या तिकिटाचे आरक्षण 23 मे पासून सुरू केले आहे. पुण्यातून दिल्लीसाठी तिकिटांची मोठी मागणी होती. तसेच मुंबई - दिल्ली मार्गावरील विमानाचीही तिकिटे मोठ्या प्रमाणात आरक्षित झाल्याची माहिती विमान वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली. प्रवासासाठी विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगची तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार मार्किंगही करण्यात आले आहे, असेही कुलदीपसिंग यांनी सांगितले. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


केंद्र सरकारने देशातील 100 विमानतळांवरून नेहमीपेक्षा 30 टक्के विमान वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि पुणे कोरोनाच्या रेडझोनमध्ये असल्यामुळे विमान वाहतूक सुरू करता येणार नाही, असे कळविले आहे. तसेच दोन्ही शहरांतील सार्वजनिक वाहतूक, कॅब सेवा  बंद आहे. तसेच रात्रीचीही संचारबंदी आहे. त्यामुळे प्रवासी विमानतळावर कसे पोचतील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

याबाबत हवाई वाहतूक विश्लेषकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, गरजेचा असेल तरच विमान प्रवास करा, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच 30 टक्के वाहतूक खुली करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेसाठी विमान वाहतूक सुरू करणे गरजेचे आहे. तसेच केंद्र सरकारने विमान प्रवासासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्या पुरेशा आहेत. जर त्यात काही कमतरता आहे, असे वाटत असेल तर, राज्य सरकारला त्यात सुधारणा करता येतील, असे वाटते. 

केंद्र आणि राज्य सरकार हे संवाद आणि समन्वयाने हवाई वाहतूकीबाबत मार्ग काढू शकतात. 
- धैर्यशील वांडेकर, हवाई वाहतूक विश्लेषकतज्ज्ञ. 
 

विमान प्रवासासासाठी मार्गदर्शक सूचना 
- प्रवासाच्या नियोजीत वेळेपूर्वी प्रवाशांनी 2 तास आधी विमानतळावर पोचावे 
- प्रवेशद्वारावर तपासणी झाल्यावर प्रवाशांना विमानतळावर प्रवेश 
- 14 वर्षांवरील प्रवाशांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणे गरजेचे 
- बॅगांसाठी प्रवाशांनी ट्रॉलीचा वापर करावा 
- प्रवाशांना विमानतळावर रांगेत उभे न राहता बोर्डिंग पास मिळणार 
- प्रत्येक प्रवाशाला चेहऱ्यावर मास्क आणि हातात गोल्व्हजचा वापर बंधनकारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT