Chandrakant-Patil
Chandrakant-Patil 
पुणे

Loksabha 2019 : बारामतीवर भाजपचे लक्ष केंद्रित - चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले गेले.

चंद्रकांत पाटील बारामतीत दर दोन दिवसांनी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रचाराची व्यूहरचनादेखील करणार आहेत. ३ एप्रिल रोजी बारामतीत भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मोदींच्या सभेसाठी तयारी
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणाऱ्या अधिकृत उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी १० किंवा ११ एप्रिल रोजी बारामतीत सभा घेणार आहेत. मोदी यांची बारामतीतील सभा जंगी व्हावी, या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आजपासूनच तयारी सुरू झाली आहे. बारामतीच्या सभेला एक लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहावा, या दृष्टीने बारामतीत नियोजन सुरू झाले आहे. बारामतीची सभा ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, शरद पवार व सुप्रिया सुळे यांना थेट शह देण्याच्या रणनीतीचा हा एक भाग समजला जात आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत नेमके काय बोलणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेऊन ‘काका- पुतण्याची राज्य उलथवून टाका’ अशी हाक दिली होती. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट अजित पवार हे विक्रमी मतांनी विजयी झाले. पंतप्रधानांच्या बारामतीच्या सभेचा नेमका काय परिणाम साधला जाणार, याबाबतही उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT