BJP
BJP 
पुणे

Loksabha 2019 : विकासकामे हाच मुद्दा

सकाळवृत्तसेवा

पुणे - भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य नागिरकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. केलेली कामे घेऊनच आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.  

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर झाले नसले तरी भाजपने प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. त्याबाबत गोगावले यांच्याशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘भाजपची बुथ रचना नियमित सुरू आहे. बुथप्रमुख आणि २५ कार्यकर्ते काम करत आहेत. बुथ स्तरावर सुरू असलेल्या कामांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी पाच बुथचे मिळून एक शक्ती केंद्र प्रमुख नेमला आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये तळागाळात जाऊन ही यंत्रणा काम करत आहे. भाजप सरकारने राबविलेल्या उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा बॅंक, सुरक्षा विमा योजना यांसह अनेक योजनांचे लाभार्थी पुण्यात आहेत. या लाभार्थ्यांशी संपर्क साधला जाणार आहे. सरकारने केलेली पाच वर्षांतील कामे नागरिकांसोर ठेवली जातील.’’ 

मित्र पक्षांबाबत गोगावले म्हणाले, ‘‘भाजप आणि रिपाइंची पूर्वीपासून युती होतीच. आता शिवसेनाही सोबत आहे. प्रचारामध्ये शिवसेनेला सोबत घेणार. सरकारने केलेल्या कामांची माहिती शिवसेनेच्याही प्रभागात दिली जाईल. पुण्यात प्रचारासाठी केंद्रातील आणि राज्यातील मंत्री येणार आहेत. त्यामुळे युतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेनेला सोबत घेऊन सभांचे नियोजन केले जाईल.’’

जाहीरनाम्यात नागरिकांचा सहभाग  
आगामी पाच वर्षांचा जाहीरनामा तयार करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. सर्व आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन सांस्कृतिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जाहीरनामा तयार केला जाईल. महापालिका निवडणुकीप्रमाणे याही वेळी नागरिकांच्या कल्पनांचा त्यात सहभाग असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT