Pune
Pune 
पुणे

Loksabha 2019 : वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती ‘किंग मेकर’

संभाजी पाटील

पुणे - मतदारांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघाची साथ कोणाला, यावर यंदाच्या निवडणुकीचा कल अवलंबून राहणार आहे. मतदारसंघाच्या एकूण २० लाख २४ हजार मतदारांपैकी ११ लाख ५९ हजार मतदार या तीन मतदारसंघांत आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचा जोर या मतदारसंघांवर असेल.

पुण्यात २०१४ च्या निवडणुकीत कोथरूड, पर्वती आणि वडगाव शेरीत मोठे मताधिक्‍य मिळविल्याने भाजपचे अनिल शिरोळे यांनी सुमारे सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. या निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत (१९ लाख ४९ हजार) ७५ हजारांनी मतसंख्या वाढली आहे. यात सर्वाधिक ४.२६ हजार मतदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात, त्याखालोखाल ३.८८ लाख कोथरूड मतदारसंघात, तर ३.४५ लाख मतदार पर्वती मतदारसंघात मतदार आहेत. 

शिवाजीनगर (२.९७ लाख), पुणे कॅंटोन्मेंट (२.८१ लाख) आणि कसबा पेठ (२.८५) या तीन विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत वरील तीन मतदारसंघात २.९४ लाख मतदार जास्त आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विधानसभा आणि महापालिकेतील नगरसेवकांची संख्या लक्षात घेता सहाही मतदारसंघात भाजपचा वरचष्मा दिसतो. 

वडगाव शेरी मतदारसंघात भाजपला ९७ हजार ३७६ मते मिळाली होती. ती काँग्रेसपेक्षा ४२ हजारांनी जास्त होती. पर्वती मतदारसंघात ६९ हजार आणि कसब्यातून ५८ हजारांचे मताधिक्‍य भाजपने घेतले होते. या तीनही मतदारसंघात भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले दिसतात. वडगावशेरी मतदारसंघात स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन महापालिकेचा सर्वाधिक निधी वळविण्यात आला. पुणे  कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर, वडगावशेरी हे २०१४ पूर्वी काँग्रेसचे मतदारसंघ म्हणून ओळखले जात होते. त्या ठिकाणची परिस्थिती सध्या बदलली आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT