लोणावळा - पावसाने ओढ दिल्याने प्रतीक्षेत असलेले धबधबे, ओढे-नाले शुक्रवारी खळाळून वाहू लागले.
लोणावळा - पावसाने ओढ दिल्याने प्रतीक्षेत असलेले धबधबे, ओढे-नाले शुक्रवारी खळाळून वाहू लागले. 
पुणे

लोणावळ्यात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढेनाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत.

दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा परिसरातील अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. पाऊस सुरू असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. पुणे-मुंबई महामार्गालगत कुमार रिसॉर्ट, गवळीवाडा येथील एसटी स्थानक, मावळी पुतळा, ट्रायोज मॉल, भांगरवाडी, वळवण, नांगरगाव, नाझर कॉर्नर, ब्रदीविशाल सोसायटी, तुंगार्ली आदी भागांत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भांगरवाडीतील लोहगड दर्शन उद्यानाजवळ झाड कोसळले. खंडाळा, कार्ला, वेहेरगाव, कुसगाव बु., औंढे-औंढोली आदी भागातही पावसाने तडाखा दिला. पाऊस लांबल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले.

मावळात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २८) सकाळपासून पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यात भात हेच खरिपाचे मुख्य पीक असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली होती. जून महिना संपत आला तरी तालुक्‍यात पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. मागील दोन-तीन दिवसात तालुक्‍याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळपासून वडगावसह संपूर्ण तालुक्‍यात पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस भात पिकासाठी अतिशय उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पवन मावळात भातरोपांना जीवदान
पवनानगर ः पवन मावळ परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसाचे शुक्रवारी (ता. २८) जोरदार आगमन झाले. त्यामुळे चिंतेत असणारा बळिराजा सुखावला आहे. नेहमी सहा जूनच्या आसपास पावसाला सुरवात होते; परंतु जून महिना संपत आला तरी पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नव्हती. शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे ओहळ व शेतखाचरात पाणी दिसू लागले, तर शेतीपंपाच्या साह्याने उगवलेली भातरोपे लागवडीयोग्य झाली असून, पावसामुळे भातलागवडीला वेग येण्याची शक्‍यता आहे.

आंदर मावळात रस्त्यावर पाणीच पाणी
टाकवे बुद्रुक : आंदर मावळात पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावलेला बळिराजा सुखावला. धूळ वाफेवर भातपेरणी करून मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाला पावसाच्या हजेरीने मोठा दिलासा मिळाला. मॉन्सून काहीसा लांबल्याने, बरेच दिवस शेतकरी बांधव पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अकराच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT