loni
loni 
पुणे

लोणी काळभोर - कदमवाकवस्तीतील कुटुंबाना दोन लाखांचा अपघाती विमा

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे बत्तीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाना दोन लाख रुपये खर्चाच्या मर्यादेचे आरोग्य कार्ड व पाच लाख रुपयांचा अपघाती विमा पॅालिसी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन काढण्यात आली. ग्रामपंचायतीसाठी अहोरात्र झटणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुबांचे आरोग्य स्वास्थाबरोबरच, कुटुबांच्या भविष्याचा विचार करुन, ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन वरील निर्णय घेण्यात आल्याची घोषना सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांनी केली. 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची लोकसंख्या पंचविस हजाराच्यावर पोहचली असुन, ग्रामपंचायतीकडे सध्या बत्तीस कर्मचारी काम करीत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने, सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारी वेळेपेक्षा कित्येक तास अधिक काम करावे लागते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पगारही कमी असल्याने, आरोग्य विमा अथवा अपघाती विमा ही बाब लांबचीच बाब होती. एखादा कर्मचारी अथवा त्यांचे नातेवाईक आजारी पडल्यास, ग्रामपंचायतीकडे आगावु रक्कम मागणे ही बाब नित्याचीच होती. नेमकी ही बाब लक्षात घेऊन, गौरी गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी वरील निर्णय घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सरपंच गौरी गायकवाड व उपसरपंच बाळासाहेब कदम म्हणाले, सध्या ग्रामपंचायतीकडे बत्तीस कर्मचारी काम करत असुन, सर्व कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. कर्मचारी अथवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास कर्मचारी पगारातुन आगावु रकमेची मागणी करत होते. यामुळे त्यांची आर्थिक परीस्थिती आनखीन खालावत होती. यातुन मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन  लाख खर्चाच्या मर्यादेचे आरोग्य कार्ड तर पाच लाख रुपयांचा अपघाती विमा असे दुहेरे कवच कर्मचाऱ्यांना देऊ केले आहे. सर्व बत्तीस क्रमचाऱ्यांनाी वरील दोन्ही कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. 

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य रमेश कोतवाल, सचिन दाभाडे, नितेश लोखंडे, नाशिर पठाण, शरीफ पठाण, वैजयंता कदम, राणी बडदे, सविता साळुंखे, वंदना काळभोर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT