Shri Mahavir Swami Jayanti
Shri Mahavir Swami Jayanti sakal
पुणे

Shri Mahavir Swami Jayanti : वाघोलीत भगवान श्री महावीर स्वामी जयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोलीत भगवान श्री महावीर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी वाचवा, जीवन वाचवा, व मतदानाचा हक्क बजावा हा संदेश देण्यात आला.

केसनंद फाटा येथून अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अशोक पवार, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते भगवान श्री महावीर स्वामी यांच्या प्रतिमेला माळा अर्पण करण्यात आली. यानंतर झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. महावीर स्वामी की जय, अहिंसा परमो धर्म, पाणी वाचवा, जीवन वाचवा, मतदानाचा हक्क बजावा आदी घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या.

रॅलीचा समारोप जैन स्थानक भवन येथे झाला. तेथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न मंजुषा, धार्मिक गाण्यावर नृत्य, भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित नाटक आदी कार्यक्रम तेथे पार पडले. यावेळी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६० जणांनी रक्तदान केले. संदीप सातव, शांताराम कटके, विद्या पाटील, शाम गावडे, दादासाहेब सातव, विजय जाचक, गणेश सातव, गणेश म्हस्के, मीना सातव, जयश्री सातव कृष्णकांत सातव, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, उमेश उंद्रे, योगिता सातव यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. श्री जैन श्रावक संघ, नवकार प्रतिष्ठान, श्री गुरु आनंद गणेश युवा मंचच्या सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

आयव्ही इस्टेट येथे धार्मिक कार्यक्रम

वाघोली दिगंबर संघाच्या वतीने आयव्ही इस्टेट ते केसनंद फाटा दरम्यान रॅली काढण्यात आली. तर आयव्ही इस्टेट येथे विविध धार्मिक पार पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT