pune
pune sakal
पुणे

लम्पीचे बैलपोळ्यावर सावट; मिरवणुका नसल्याने बैलांना सजविण्याचे साहित्य पडून

सुदाम बिडकर

लम्पीचे बैलपोळ्यावर सावट मिरवणुका नसल्याने बैलांना सजविण्याचे साहित्य पडून राहिल्याने हजारोंचे नुकसान.

पारगाव : लम्पी आजाराचे सावट भाद्रपदी बैलपोळा सणावर जाणवत आहे लम्पी आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी बैलपोळा सणानिमित बैलांना एकत्र आणून त्यांच्या मिरवणूक काढण्यावर आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी पत्रक काढून बंदी आणली आहे त्यामुळे बैलांच्या मिरवणुका निघणार नसल्याने बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या विक्रीवर प्रणाम झाला असून या साहित्यांना मागणी नसल्याने दुकानात साहित्य पडून राहिले आहे त्यामुळे व्यवसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे.

शेतकरी बैलपोळ्याला बैलांना आकर्षक सजवून गावातून सवाद्य मिरवणूक काढतात बैल सजविण्यासाठी घुंगर माळ, गळ पेंडी, म्होरक्या , वेसनी, गोंडा पट्टा, गोफ माळ, द्रुष्ट पट्टा, बाशिंग, झुली, तोडे, कवडी पट्टा, भिंगरी तुरा, गोफ म्होरकी, चाबुक, संत्रा माळ, शिंगाना रंगवण्यासाठी विविध प्रकारचे रंग, रंगीत बेगडे आदि साहित्य वापरले जाते या सर्व साहित्याने बाजारपेठेतील दुकाने फुलून गेलेली असतात. व्यावसायिक या सर्व मालाची तीन चार महिने अगोदरच खरेदी करून ठेवतात बैलपोळ्याला या साहित्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

राज्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्याने व हा आजार सांसर्गिक असल्याने शासनाने संपूर्ण महाराष्ट्र हे नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे या आजाराच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रांण्याचे प्रदर्शन , जनावरांचा बाजार यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुशंगाने बैल पोळ्या निमित्त गावातील बैल मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन मिरवणूक निघण्याची शक्यता असल्याने आंबेगाव तालुक्यातील सर्व गावात लम्पिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैलपोळ्याच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असल्याचे पत्रक तहसीलदार रमा जोशी यांनी काढले आहे त्यामुळे बैलांच्या मिरवणुका निघणार नसल्याने बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असून या साहित्यांना मागणी नसल्याने दुकानात साहित्य पडून राहिले आहे हे सर्व साहित्य वर्षभर सांभाळावे लागणार आहे त्यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे पारगाव येथील व्यावसायिक संदीप निकम यांनी सांगितले.

लम्पीचा प्रसार होऊ नये यासाठी बैलपोळा सणानिमित बैलांना एकत्र आणून त्यांच्या मिरवणूक काढण्यावर बंदी असल्याने बैलांच्या मिरवणुका निघणार नसल्याने बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असून मागणी नसल्याने दुकानात साहित्य पडून राहिले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT