Mahadev-jankar
Mahadev-jankar 
पुणे

बारामतीतूनच लढणार - जानकर

सकाळवृत्तसेवा

बारामती - ‘‘राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. मात्र, बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,’’ असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला.

जानकर यांनी पत्रकार महेंद्र कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर माहिती दिली. ‘‘बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही मागणार आहोत. मागील लोकसभेच्या वेळीच मला माढा मतदारसंघ हवा होता. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या पक्षाचे हित समोर ठेवून षड्‌यंत्र केले व त्यांच्याकडे तो मतदारसंघ घेतला,’’ असे ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी जानकर यांनी बारामतीतून लोकसभा लढणार असल्याचे सांगितले होते. याबाबत त्यांना विचारले असता ते  म्हणाले, ‘‘मी पक्षाचा अध्यक्ष आहे. मी कोठूनही लढू शकतो. बारामतीतूनच लढण्याला प्राधान्य असेल.’’ 

धनगर आरक्षणासंदर्भात आरक्षण कमिटी नेमली आहे. तिचा अहवाल सकारात्मक येईल, तेव्हा सरकार निश्‍चित आरक्षण लागू करेल. केंद्र व राज्य सरकार सकारात्मक आहे. धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची इच्छा तरुणांना असली तरी केवळ आरक्षण - आरक्षण म्हणून चालणार नाही. आम्ही सत्तेत आलो, ते काही एकट्या समाजाच्या बळावर नाही. जर कोणी केवळ आरक्षणामुळे महादेव जानकर सत्तेपर्यंत पोचले असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांबाबत राग असू शकतो. मात्र, आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

SCROLL FOR NEXT