ताथवडे - महापारेषणच्या उच्चदाब वाहिनीखाली झालेली बांधकामे.
ताथवडे - महापारेषणच्या उच्चदाब वाहिनीखाली झालेली बांधकामे. 
पुणे

मृत्यूच्या तारेखालील जीवन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘महापारेषण’च्या उच्चदाब वीजवाहिन्यांखाली शहरातील सुमारे पाचशे बांधकामे आहेत. त्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या दोन हजारांवर आहे. अशा ठिकाणी विजेचा झटका बसून दर वर्षी १० ते १२ अपघात होत आहेत. तरीही नागरिक दुर्लक्ष करत असून, मृत्यूच्या तारेखाली रोजचे जीवन जगत आहेत. तसेच, काही ठिकाणी वाहिन्यांवरून किंवा खांबांवरून डिश टीव्ही केबल टाकल्याने मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे.

शहरातील रुपीनगर, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी, वाकड, भूमकर चौक, वाल्हेकरवाडी, जगताप डेअरी चौक, औंध-रावेत रस्ता, काळा खडक, चिखली, साने चौक, म्हेत्रे वस्ती आदी भागांत ‘महापारेषण’च्या उच्चदाब वीजवाहिन्या आहेत. त्याखाली व बाजूने सर्वाधिक बांधकामे आहेत; तसेच काही ठिकाणी वाहिन्यांसह खांबांवरून वेगवेगळ्या केबल टाकल्या असल्याने अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी ‘महापारेषण’कडून नागरिकांना नोटीस बजावण्यात येते. तसेच, अधीक्षक अभियंता वंदनकुमार मेंढे व कार्यकारी अभियंता पूनम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती केली जात आहे. त्यासाठी ‘सायकल’ व ‘ऑटोरिक्षा ब्रॅण्डिंग’ उपक्रम सुरू केला. त्याचे उद्‌घाटन चिंचवड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तत्त्वशील मस्के यांच्या हस्ते थेरगावमधील डांगे चौकात झाले. 

म्हस्के म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील उच्चदाब वाहिन्यांखाली अतिक्रमणे व अपघातांची संख्या वाढली आहे. हे अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

नागरिकांनी अतिउच्चदाब वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवून बांधकाम करावे. विजेच्या तारांना चिकटून किंवा त्याखालून इंटरनेट किंवा मनोरंजन वाहिन्यांसाठीच्या केबल ओढू नयेत.’’

महापारेषणच्या वीजवाहिन्या
११  -  २२० केव्ही
६  -  १३२ केव्ही
७  -  १०० केव्ही  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT