Murlidhar Satav
Murlidhar Satav Sakal
पुणे

Baramari News : महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्ट्रार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर सातव

मिलिंद संगई,

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्ट्रार असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुण्यातील जेधे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार मुरलीधर सातव

बारामती - महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्ट्रार असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुण्यातील जेधे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार मुरलीधर सातव यांची, सरचिटणीसपदी औरंगाबादच्या दर्शना जोशी गांधी यांची तर खजिनदारपदी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांची नुकतीच निवड झाली.

पुण्यातील गरवारे महाविद्यालयात असोसिएशनच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. गेल्यावर्षी ऑनलाईन सभेमध्ये निश्चित झाल्यानुसार नूतन कार्यकारिणीचे गठण झाले. राज्यातील विविध महाविद्यालयातील 120 रजिस्ट्रारपैकी 30 रजिस्ट्रार या बैठकीस उपस्थित होते.

कार्याध्यक्ष म्हणून गडहिंग्लजच्या शिवाजी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर, राजगुरूनगर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार गजानन पाठक यांची प्रमुख सल्लागार पदी निवड झाली.

या असोसिएशनच्या बैठकीमध्ये उच्च शिक्षणात होणारे बदल, नवीन शैक्षणिक धोरण, स्वायत्तता त्याचे दैनंदिन कामकाजावर होणारे परिणाम, विविध बदलांवर करायची उपाययोजना, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. सदर बैठकीचे नियोजन गरवारे महाविद्यालयाचे रजिस्ट्रार किसन साबळे यांनी केले , संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष मॉडर्न महाविद्यालयाचे रजिस्ट्रार गणेश साठे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT