पुणे

भोसरी : महेश लांडगे यांना मोठी आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी आठव्या फेरीअखेर 30744 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे हे पिछाडीवर आहेत. 
 

अपक्ष परंपरा खंडित होणार? 
मतदारसंघ अस्तित्वात येऊन दहा वर्षे झाली. या कालावधीत दोन विधानसभा निवडणूक झाल्या.
त्यात अपक्षांनीच बाजी मारली. पहिल्यांदा विलास लांडे व नंतर महेश लांडगे आमदार झाले. आता
दोघेही प्रतिस्पर्धी आहेत. 

- 2009 : मतदारसंघाचे प्रथम आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला. त्यांनी
अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
मंगला कदम होत्या. केवळ 1200 मतांनी लांडे विजयी झाले होते. 

- 2014 : लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अपक्ष
निवडणूक लढविली व विजयी झाले. लांडे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसऱ्या स्थानावर
शिवसेनेच्या उबाळे राहिल्या. भाजपचे एकनाथ पवार चौथ्या क्रमांकावर होते. लांडगे यांना 60 हजार
173 मते मिळाली होती. 

- 2019 : चार वर्षांपूर्वी लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ते भाजपचे उमेदवार
आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी लांडे आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने
पुरस्कृत केले. मात्र, 2014 मध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले पवार आता लांडगे यांच्यासोबत
आहेत. शिवाय मतदारसंघातील 43 पैकी 34 नगरसेवक लांडगे यांचे समर्थक आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT