पुणे

मावळ : सुनील शेळके यांचा एकतर्फी विजय | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मावळ (पुणे) : राज्यातील चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी इतिहास घडविला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले.

शेळके यांनी 90 हजारांपेक्षा अधिक मतांनी मताधिक्‍य घेतल्याने राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा आता दारून पराभव झाला आहे. शेवटपर्यंत चुरशीची वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एकतर्फीच ठरली. 

मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात चुरशीची लढत होती. 2009 आणि 2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. दरम्यान, या वेळी भाजपमधील सुनील शेळके हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्यांनी निवडणुकीची तयारी तीन वर्षांपासूनच सुरू केली होती. मात्र, भेगडे यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी घेतली.

एकाच मुशीत तयार झालेले दोन कार्यकर्ते या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने चुरस निर्माण झाली होती. दोघांनीही मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदानही मोठ्या प्रमाणात झाल्याने चुरस अधिक वाढली होती. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून शेळके यांनी मताधिक्‍यात घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

भेगडे यांचा इतका मोठा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. सलग 25 वर्षांपूर्वी रूपलेखा ढोरे यांनी राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणली होती. त्यानंतर प्रत्येकी दहा वर्षे दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे या दोघांनी तालुक्‍यावर वर्चस्व केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT