Rickshaw
Rickshaw 
पुणे

Vidhan Sabha 2019 : प्रचारात रिक्षांचे मीटर ‘सुसाट’

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा  2019 : पिंपरी - सध्याच्या डिजिटल आणि सोशल युगात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरात रिक्षा रस्त्यांवर उतरवल्या आहेत. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रचार करण्यासाठी रिक्षांची ‘क्रेझ’ कायम असल्याने रिक्षामालक व चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. केवळ दहा तासांसाठी तब्बल दीड हजार रुपये मिळत असल्याने रिक्षाचालकांची चांदी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. रिक्षा फिरत असल्याने निवडणुकीच्या प्रचाराचे मीटर धावू लागले आहेत.

एरवी दिवसाला दोनशे ते अडीचशे रुपयांची शिप तयार करण्यासाठी रिक्षाचालकांना तासन्‌तास रिक्षाथांब्यावर थांबावे लागते. तरीही रिक्षांची वाढती संख्या पाहता, शिप तयार होऊन घरखर्च तयार होत नाही. दिवसाकाठी प्रवासी फिरवून मिळणाऱ्या पैशापेक्षा अधिकचे पैसे या प्रचारासाठी मिळत असल्याने काही रिक्षाचालक आपली रिक्षा प्रचारासाठी फिरवताना पाहायला मिळत आहेत. अशातच सध्या सर्वत्र निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने वॉररूम, डिजिटल व सोशल मीडियाच्या युगामध्येही निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रचारासाठी तीनआसनी रिक्षांना पसंती दिली आहे. सकाळी साडेनऊपासून ते सायंकाळी सहापर्यंत रिक्षातून प्रचार करण्यात येत असल्याने दिवसातील दहा तासच ठराविक परिसरातून रिक्षा फिरवावी लागत आहे. 

शहरात प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांकडून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रचार करण्यासाठी रिक्षा प्रचाराला महत्त्व दिले आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात ४१ वाहनांपैकी निव्वळ ३३ रिक्षाच आहेत. दोन्ही बाजूला पक्षाचे झेंडे, उमेदवाराचे छायाचित्र, नाव आणि निवडणुकीचे चिन्ह असलेले फलक; तसेच एका बाजूला लावलेला भोंगा, अशा रिक्षा धावताहेत. गल्लोगल्ली रिक्षांवर भोंगा आणि स्पीकरमधून राजकीय पक्षांची गीते, उमेदवाराचा परिचय, प्रचाराची विविध गीते वाजवली जात आहेत. पूर्वी रिक्षात बसलेल्या व्यक्तीकडून ध्वनिक्षेपकांवरून उमेदवाराचा प्रचार केला जात असे. बदलत्या काळात त्याची जागा आता आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांनी घेतली आहे. विविध पक्षांची गाणी नागरिकांच्या कानावर पडत आहेत. प्रत्येक उमेदवार रिक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

दररोज दीड हजार रुपयांची कमाई 
शहरात इच्छुक उमेदवारांकडून तीन महिन्यांपूर्वी रिक्षांना फलक प्रचाराला सुरवात केली होती. राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यावर अनेकांनी दिवसाला दीड हजार रुपयांवर रिक्षाप्रचार सुरू केला. माईक, स्पीकर असे सर्व साहित्य संबंधित उमेदवारांकडून दिले जाते. प्रचारासाठी रिक्षा भाड्याने दिल्यामुळे बऱ्यापैकी रोजगार मिळाल्याची भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

मतदारसंघनिहाय रिक्षा संख्या
४० पिंपरी
३३ चिंचवड
३७ भोसरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT