गणेशनगर (कोथरूड) - महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेनंतर मतदारांशी संपर्क साधला. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, चंद्रकांत मोकाटे, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.
गणेशनगर (कोथरूड) - महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेनंतर मतदारांशी संपर्क साधला. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, चंद्रकांत मोकाटे, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पूरग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यात यश - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे, असे मत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना- आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पाटील यांच्या प्रचारार्थ पूरग्रस्त वसाहत प्रभाग क्र. १३ मध्ये पदयात्रा आयोजित केली होती. याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पूरग्रस्त वसाहतीतील साई मंदिरात साईंचे दर्शन घेऊन पाटील यांनी या पदयात्रेस प्रारंभ केला. गणेशनगरमधील शनी-मारुती मंदिरात पदयात्रेचा समारोप झाला. या वेळी दादांनी संपूर्ण परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. 

ठिकठिकाणी फटाक्‍यांच्या आतषबाजीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून दादांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे आदी उपस्थित होते. या पदयात्रेमध्ये तरुणांसोबतच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 

पूरग्रस्तांचा पाठिंबा
गेल्या अनेक वर्षांपासून पानशेत पूरग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न पाटील यांनी केवळ दोन बैठकीत सोडवल्याने पानशेत पूरग्रस्तांकडून पाटील यांचे प्रभागात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, प्रभागातून मोठे मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही या वेळी पूरग्रस्त समितीचे मंगेश खराटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT