पुणे

माळेगावकरांनो, पाणी प्यायचे असेल तर वीजबिल भरा !

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव ः सुमारे ७२ लाख रुपये थकलेल्या वीज बिलापोटी किमान २५ लाख रुपये भरल्याखेरीज आम्ही माळेगाव नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा विद्युत पुरवठा जोडणार नाही, अशी ठोस भूमिका महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी. व्ही. गावडे यांनी घेतली आहे. तर नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आल्याने आणि पुर्वीच्या ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यावर काहीच पैसे शिल्लक नसल्याने माळेगावचे प्रशासन सध्यातरी वीज बिल भरू शकत नाही, या समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मार्ग काढण्यासाठी पाठवुराव सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार तथा माळेगाव नगरपंचायतीचे प्रशासक विजय पाटील यांनी कळविली.

दरम्यान, या प्रतिकूल स्थितीत मात्र ३५ हजार लोकसंख्या असलेल्या माळेगावकरांचे दैनंदिन जीवनविस्कळीत होऊ लागले आहे. माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायतीचा कार्य़काळ सुरू होऊन साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सरकारने बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना सदर नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून कामकाज पाहण्यास नियुक्त केले आहे. माळेगावची ३५ हजार लोकसंख्या विचारात घेता येथील मुलभूत सोईसुविधा पुरविण्यासाठी हे प्रशासन या ना त्या कारणांनी कमी पडत आहे. अर्थात प्रशासन चालविण्यासाठी नगरपंचायत अथवा ग्रामपंचायतीची अर्थिक स्थिती चांगली असावी लागते, परंतु माळेगाव नगरपंचायतीची अर्थिक स्थिती खुपच नाजूक आहे. परिणामी कामगारांचे वेतन, दैनंदिन खर्च आणि विज बिलांसारखी शासकिय देणी देण्यासाठी माळेगावात उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. गावकऱ्यांकडे पाणी पट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून येणारा करही मोठ्या प्रमाणात थकला आहे. त्यातच नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून दैनंदिन खर्चासाठी शासनाकडूनही अद्याप पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. या प्रतिकूल स्थितीमुळे वीज बिलासह शासकिय देणी रखडलेली आहेत. परिणामी वीज वितरण कंपनीने सुमारे ७२ लाख रुपये थकलेल्या वीज बिलापोटी माळेगावचा पाणी पुरवठा गुरवार (ता. २४) रोजी बंद केला. सहाजिकच या प्रतिकूल स्थितीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जिवन विस्कळीत होऊ लागले आहे. एकाबाजूला थकबाकी पैकी किमान २५ लाख रुपये वीज बिल भरणा केल्याखेरीज माळेगावचा वीज पुरवठा जोडला जाणार नाही, तर दुसऱ्याबाजूला नगरपंचायतीकडे वीज भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे म्हणणे प्रशासकांनी सांगितल्याने गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कसा सुटणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणची भूमिका- बारामतीच्या ग्रामीण भागात माळेगाव ऐवढी मोठी वीज बिलाची थकबाकी कोणाचीच नाही. वास्तविक या गावात उत्पन्नाचा स्त्रोत जास्त असतानाही येथील प्रशासनाने वर्षानुवर्षे पुर्णतः वीज बिल भरण्याची मानसिकता ठेवली नाही. त्यामुळे खरेतर जवळपास ७२ लाख रुपयांपर्यंत वीज बिलाची थकबाकी वाढत गेली. वास्तविक नागरिकांना त्रास व्हावा ही आमची इच्छा नाही, परंतु आमचाही नायविलाज झाल्याने पाण्याचा विद्युत पुरवठा खंडीत करावा लागला. थकबाकीपैकी किमान २५ लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आम्ही प्रशासक विजय पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी. व्ही. गावडे यांनी स्पष्ट केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा- प्रशासक विजय पाटील म्हणाले, माळेगावकडे १५ व्या वित्तआयोगातील काही निधी उपलब्ध आहे. त्यानिधीतून वीज बिलाचा भरणा करण्यास परवानगी जिल्हाधिकारी कार्य़ालयातून मिळते का ? याबाबत पाठपुरवा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय हा निधी खर्च करता येत नाही. असे असले तरी गावकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कर वसूलीसारख्या उपाययोजना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT