manoj jarange fight curative petition on maratha reservation hearing finished in supreme court
manoj jarange fight curative petition on maratha reservation hearing finished in supreme court Sakal
पुणे

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने नारायणगाव येथे मोठा जल्लोष: पेढे,लाडू भरवून केला आनंद साजरा

रवींद्र पाटे

नारायणगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतच्या लढ्याला यश आल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने नारायणगाव येथे मोठा जल्लोष करण्यात आला.

एकमेकांना पेढे,लाडू भरवून, एकमेकाला आलिंगन देऊन, फटाक्याची आताशबाजी करून दिवाळीच्या सणाप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव येथील बस स्थानक आवारात झालेल्या कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे माऊली खंडागळे, शोभा पाचपुते,

मनीषा मुळे, जितेंद्र गुंजाळ, सचिन थोरवे, अनिल गावडे, राजेश भोर, दिगंबर भोर,संतोष मोरे,योगेश तोडकर,रवींद्र वामन, दत्ता वामन,अशोक गायकवाड, लहू मुळे, पिंटू गांडूळ आदि उपस्थित होते.

सकल मराठा समाजाचे माऊली खंडागळे म्हणाले आरक्षण नसल्यामुळे गुणवत्ता असूनही मराठा समाजातील तरुण शिक्षण व नोकरी पासून वंचित राहात होते. मराठा आरक्षणाबाबत शासनाने अध्यादेश काढल्याने मराठा समाजातील तरुणांमधील नैराश्य कमी होण्यास मदत होणार आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्नरचे तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी यांची लवकरच भेट घेऊन अध्यादेशात नमूद केलेल्या अटी व शर्थीचे कसे पालन केले जाते. याबाबत चौकशी केली जाणार आहे.

अध्यादेशात नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरून प्रमाण पत्रकाचे वाटप कधी होणार. याबाबत पाठपुरावा केला जाईल.

खंडागळे, सुरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफ्याला आडवे जाऊन काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

याबाबत खंडागळे म्हणाले यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. मराठा म्हणून आंदोलन केले. लोकशाही मार्गाने उपमुख्यमंत्री पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांचा निषेध केला नाही.या वेळी महिलांच्या वतीने सरपंच शोभा पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT