Society-fertilizer
Society-fertilizer 
पुणे

शहरातील ४६ सोसायट्यांकडून खतनिर्मिती

पीतांबर लोहार

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडे नोंदणी झालेल्या ६५० पैकी ४६ सोसायट्यांनी कचराप्रक्रिया प्रकल्प उभारले असून, त्यांच्याकडून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. त्यात मोशी-चिखली आणि पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांची संख्या सर्वाधिक आहे. आणखी दहा सोसायट्यांनी प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. 

महापालिकेने शहरातील कचरा निर्मितीची ठिकाणे, कचऱ्याचे प्रकार व विल्हेवाट लावण्याचे प्रमाण याबाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या आदेशानुसार कचरा निर्मितीच्या ठिकाणी शंभर टक्के वर्गीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार गृहनिर्माण सोसायट्यांना स्टार रेटिंग देण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोसायट्यांना मिळकतकरात सूट देण्याची योजना आखली आहे. तसेच, स्वच्छ शहरासाठी नवनवीन कल्पना सुचविण्याचे आणि घराघरांत कचऱ्यापासून खत निर्मितीवर भर देण्याचे आवाहनही महापालिकेने नागरिकांना केले आहे. त्याला बहुतांश सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  डिसेंबर २०१८पर्यंत महापालिकेकडे ६५० सोसायट्यांनी नोंदणी केलेली आहे.

त्यातील सर्वाधिक १८२ सोसायट्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील म्हणजेच वाकड, पिंपळे सौदागर भागातील आहेत. त्यातील १५ सोसायट्यांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडे ९० सोसायट्यांची नोंदणी असून, १६ सोसायट्यांनी खत प्रकल्प साकारला आहे. यातील बहुतांश सोसायट्या चिखली- मोशी पट्ट्यातील आहेत. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील २९ सोसायट्यांनी महापालिकेकडे नोंदणी केलेली आहे. त्यातील अद्याप कोणीही खत निर्मिती प्रकल्प उभारलेला नसला, तरी दहा सोसायट्यांनी प्रकल्प उभारणीबाबत तयारी दर्शविली आहे. या कार्यालयाच्या क्षेत्रात जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगर लांडेवाडी, एमआयडीसीचा काही भाग, वल्लभनगर या भागांचा समावेश होतो.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत शहरातील स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायट्यांना स्टार रेटिंगनुसार गुण देऊन मिळकतकरात सवलत दिली जाणार आहे. खत निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी अनेक सोसायट्यांनी तयारी दर्शविली आहे. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT