MarathaKrantiMorcha Aalefata in junnar is closed
MarathaKrantiMorcha Aalefata in junnar is closed 
पुणे

आळेफाटा येथे कडकडीत बंद

अर्जुन शिंदे

आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता.२४) सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान येथील मुख्य चौकात विशेष सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

आळेफाटा येथील सर्व दुकाने आज सकाळपासून बंद होती. येथील पुणे - नाशिक व कल्याण - नगर महामार्ग एकत्र येत असलेल्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या सभेत, मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे स्व. काकासाहेब शिंदे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी किशोर कुऱ्हाडे, संतोष चौगुले, प्रदीप चाळक, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, मंगेश काकडे, प्रदीप देवकर, कान्हू पा. कुऱ्हाडे, अतुल भांबेरे, कैलास वाळुंज, नाना कुऱ्हाडे, सचिन वाळुंज, चंद्रशेखर कुऱ्हाडे, अर्जुन पाडेकर, नितीन वाळुंज आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान राजुरी येथेही सभा झाली. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, उपसरपंच चंद्रकांत जाधव, सुदाम औटी, ज्ञानेश्वर हाडवळे, एकनाथ शिंदे, सतीश पाटील - औटी, किशोर हाडवळे, गिरीश हाडवळे, राजेंद्र हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते. याठिकाणीही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT