marathi news kalashree program songs dance
marathi news kalashree program songs dance 
पुणे

शास्त्रीय गायन, कथ्थक नृत्याने कलाश्री संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

रमेश मोरे

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत, २१ व्या कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्रीय गायन कथ्थक नृत्य अविष्काराने सांगवीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. संगीत महोत्सवाच्या दुस-या दिवशीच्या सुरवातीला राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन झाले.

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन युवा नेते जवाहर ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कलाश्री संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरवात संदीप गुरव यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी 'पुरीया कल्याण' या रागामध्ये 'गावे गुणी' हा विलंबित एकतालमधील ख्याल सादर केला आणि 'बहुत दिन बिते' हा तीनतालमधील छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर त्यांनी 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातील 'घेई छंद मकरंद' हे नाट्यगीत सादर केले व 'माझे माहेर पंढरी' हा अभंग सादर करुन गायनाचा शेवट केला. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत प्रभाकर पांडव, तबला साथसंगत दशरथ राठोड, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, टाळसाठी सर्वेश बाद्रायणी तसेच तानपुऱ्यासाठी दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे यांनी साथसंगत केली. 

दुस-या सत्रात रुचिरा काळे यांचे गायन झाले. त्यांनी 'शुद्ध कल्याण' या रागात 'येरी माई पिया' हा बडा ख्याल तर छोट्या ख्यालात 'निंद न आवत' व 'सुनो सखींरी' या बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यांनी सुप्रसिध्द गायिका गिरीजा देवी यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांचा सुप्रसिद्ध दादरा 'दिवना किए शाम क्या जादू डाला' सादर केला. या दादऱ्यास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यांना हार्मोनियमची साथ गंगाधर शिंदे तर तबला साथ गणेश तानवडे यांनी केली तसेच नम्रता महाबळ व धनश्री लोणकर यांनी तानपुरा साथ केली. रुचिरा काळे यांच्या गायनानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी यांनी राग 'मारुबिहाग' मध्ये 'रसिया आवो न जावो' ही विलंबित एकतालात तर द्रुत तीनतालमध्ये 'परि मोरी नाव मजधार में' या बंदिशी अतिशय बहारदारपणे सादर केल्या. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशींच्या आवाजात अजरामर झालेले 'बाजे रे मुरलीया बाजे' हे भक्तीगीत गायले. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत अविनाश दिघे, तबला साथसंगत प्रशांत पांडव, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, टाळासाठी सदाशिव सावळे तसेच तानपुऱ्यासाठी मकरंद बाद्रायणी व दिगंबर शेडूळे यांनी साथसंगत केली. 

कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. पूर्वा शहा यांच्या बहारदार कथ्थक नृत्याने झाली. त्यांनी नृत्याची सुरवात शिवस्तुतीने केली. त्यानंतर त्यांनी ताल तीनतालमध्ये उठाण, आमद व तुकडे सादर केले. शेवटी त्यांनी एका बंदीशीवर आपला कला अभिनय सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. नामदेव तळपे व प्राची पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे छायांकन नामदेव तौर यांनी केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT