dandage
dandage 
पुणे

उरुळी कांचन येथील विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

उरुळी कांचन : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी 'सकाळ माध्यम समूह'च्या वतीने आयोजित 'सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७' या स्पर्धेत पूर्व हवेलीतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला भरारी मिळण्यासाठी घेतलेल्या या चित्रकला स्पर्धेसाठी या भागात चार परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली. 

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परिसरातील जिल्हा परिषद शाळा, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल, एंजल हायस्कूल, सायरस पुनावाला स्कूल, बी. जी. शिर्के विद्यामंदिर, सरस्वती विद्यामंदिर, अमर एज्युकेशन (कोरेगाव मूळ) येथील एकूण १ हजार ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेत येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग हा सर्वांच्या आकर्षणाचा भाग ठरला. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी, उपप्राचार्य अ. वि. काकडे, पर्यवेक्षक बी. के. दिवेकर, कला शिक्षक आर. आर. वेदपाठक, डी. जे. यादव, मेघना खाडिलकर, आबासाहेब सायकर व शारीरिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल येथील चित्रकला स्पर्धेचे नियोजन कला शिक्षक पराग होलमुखे, एस. बी. कांबळे, डी. बी. डवरे, एस. व्ही. साळुंखे, आर. एम. साठे, आर. एम. सुतार यांनी केले होते. यावेळी परिसरातील जिल्हा परिषद शाळा, एंजल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सेंट तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल, कन्या प्रशाला, पृथ्वीराज कपूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

पुरोगामी माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावरील चित्रकला परीक्षेचे नियोजन केंद्रप्रमुख बी. एस. मिरगे, आर. एम. चव्हाण, एस. पी. पडवळ यांनी केले. थेऊर येथील चिंतामणी विद्यामंदिर येथे विद्यालयाचे कला शिक्षक हरिशचंद्र भरीत, सहाय्यक शिक्षक एल. जी. लोंढे, के. एस. कंद यांनी परीक्षेचे नियोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT