पुणे

प्रसुतीदरम्यान त्रास देणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी

पराग जगताप

ओतूर (ता.जुन्नर) : जुन्नर येथील श्री छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात प्रसुती दरम्यान कर्तव्यात कसूर करुन त्रास देणाऱ्या डॉक्टर व परिचारीकेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने 'सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना केली.

बल्लाळवाडी ता. जुन्नर गावच्या हद्दीतील पांगरीमाथा ठाकर वस्तीतील या महिलेस प्रसूती त्रास सुरु झाल्यामुळे जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आनिता बटवाल यांनी सहा डिसेंबर रोजी पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास दाखल केले होते.

पीडित महिला म्हणाली, कि रुग्णालयात दाखल झाल्यावर तेथील महिला डॉक्टर व परिचाjfकेने प्रसुतीसाठी 'तू कळा घे. कळा नाही घेतल्या तर तुला पुण्याला पाठवावे लागेल' असा धाक दाखवला. तसेच त्रास देऊन हलगर्जीपणा व दुर्लक्ष केले. डॉक्टर व परिचारिका 'या महिलेस पुण्याला न्या' असे सांगून निघून गेल्या. त्याच दरम्यान तिची प्रसुती झाली.

त्यानतंर तीस बाह्यरुग्णाबरोबर अनिता व बाळाला जनरल विभागात ठेवले. तसेच बाळाच्या प्रकृतीकडे व स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. तीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी घरी जाण्यासाठी साधी शासकीय रुग्णवाहिकाही पाठवण्यात आली नाही.

घरी गेल्यानंतर बाळाची प्रकृती खालावली त्यामुळे या कुटुंबाने त्यास जुन्नर येथे खासगी बालरोगतज्ज्ञाकडे नेले असता त्यास ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तेथे गेले असता डॉक्टरानी बाळाला घेऊन दुसरऱ्या बालरोगतज्ज्ञाकडे पाठवले. तेथे उपचारादरम्यान बालकाचा मृत्य झाला.

या सर्व घटनेची चौकशी व्हावी. उपचारादरम्यान हलगर्जीपणा करुन त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि या सर्व प्रकाराची वरिष्ट पातळीवर गंभीर दखल घेतली असून सदर घटनेची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT