पुणे

शाळेचे दुसरे सत्र सुरू; पण अदयाप ब्रेल पुस्तके नाहीत!

संदीप जगदाळे

पुणे : चालू वर्षी सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला. मात्र अदयाप नववीच्या वर्गाची दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठीची ब्रेल पुस्तके शाळा व विदयार्थ्यांना उपल्बध झालेली नाहीत. त्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

सामान्य मुलांची पाठय पुस्तके रिडरकडून वाचून घेवून विदयार्थ्यांना आपला अभ्यास करावा लागत आहे. जून महिन्यात सर्वसामान्य मुलांना पाठयक्रमाची पुस्तके उपल्बध होतात. मात्र आजही दृष्टिहिन विदयार्थी ब्रेल पुस्तकांपासून वंचित आहेत. त्यामुळे विदयार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाचे व भीतीचे वातावरण आहे. 

दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही आजपर्यंत नववीच्या वर्गाची हिंदी, इंग्रजी व विज्ञान विषयांची पुस्तके अदयाप उपल्बध झालेली नाहीत. तर मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्राची पुस्तके उशीरा नोव्हेंबर महिन्यात उपल्बध झाली आहेत. तर पहिले सत्र संपल्यानंतर सातवीची पुस्तके उपल्बध झाली आहेत. पुस्तके कधी उपलब्ध होतील याची चिंता विदयार्थ्यांना लागून राहिली आहे. 

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेचे प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले, एप्रिल महिन्यामध्येच आम्ही ब्रेल पुस्तकाची अॅार्डर दिली होती. मात्र नववीच्या वर्गाची हिंदी, इंग्रजी व विज्ञान विषयांची पुस्तके अदयाप उपल्बध झालेली नाहीत. जी पुस्तके उपल्बध झाली आहेत, त्यात अनेक व्याकरणाच्या चुका आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुस्तके लवकर उपल्बध व्हावीत यासाठी आम्ही वारंवार नॅशनल असोसिएशन फॅार दि ब्लाईंड, मुंबई य़ेथील ब्रेल पेस विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. 

नॅशनल असोसिएशन फॅार दि ब्लाईंड, मुंबई य़ेथील ब्रेल पेस विभागाचे प्रमुख विजय नवाळे म्हणाले, कागद मीलने संप केल्याने ब्रेल पेपर उपल्बध होण्यास उशीर झाला. तसेच अभ्यासक्रम बदलल्यानंतर टेक्स्ट ब्युरोकडून आम्हाला 7 वी व 9 वी ची पुस्तके उशीरा मिळाली. तसेच एकाच वर्षी दोन वर्गांचा अभ्यासक्रम बदलला. त्यामुळे छपाईवर लोड आला. तसेच सामान्य पुस्तकांच्या तुलनेत ब्रेल पुस्तके छपाई करण्यास वेळ लागतो. आमच्याकडे महाराष्ट्रातील 35 अंधशाळांच्या पुस्तक छपाईच्या आॅर्डर येतात. हे काम मोठे आहे. तसेच शासनाची देखील ब्रेल पुस्तके छपाई आम्हाला करावी लागते. त्यामुळे पुस्तके छापण्यास विलंब झाला. मात्र लवकरच हे काम पूर्ण होईल, सर्व शाळांना पुस्तके उपल्बध होतील. 

महाविदयालयीन विदयार्थी ब्रेल पुस्तकांपासून वंचित
'नॅब'कडून महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठीची शैक्षणिक ब्रेल पुस्तकांची छपाई केली जात नाही. त्यामुळे या विदयार्थ्यांना सामान्य पुस्तके रिडकरडून वाचून घेणे किंवा ज्या विषयांची ऑडिओ बुक उपलब्ध आहेत, त्याद्वारे अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांंना तर ऑडिओ बुक उपल्बध होणे अशक्य असते. महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी ब्रेल पुस्तके उपल्बध व्हावीत अशी विदयार्थ्यांची गेली अनेक वर्षे मागणी आहे, मात्र त्याची दखल अदयाप घेतली गेलेली नाही. त्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT