पुणे

समाजकल्याण खात्याच्या आवारातील लग्न सोहळ्यामागील तथ्य काय?

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे : सरकारी कार्यालयांतील प्रांगणाचा वापर कुठल्याही खाजगी कार्यक्रमांसाठी करता येत नाही. असे असतानाही पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयात काल एका कर्मचा-याच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला, यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. मात्र हा सोहळा इथे कसा पार पडला, याची पार्श्वभूमी नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'साम टीव्ही'ने केला.

पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर शुभविवाहाचा फलक होता. आयुक्तलयाच्या प्रांगणात मांडवदेखील होता. या वातावरणात काल हरिश्चंद्र गायकवाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. ज्यावरुन आज दिवसभर टीका केली जात आहे. हरिश्चंद्र गायकवाड हे समाज कल्याण विभागात काम करणारे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी. कार्यलयाच्या आवारातच सरकारी क्वार्टरमध्येच ते राहतात. क्वार्टर आणि कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे, गायकवाड यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांनी आयुक्तालयाच्या आवारातच मुलीचे लग्न केले आणि यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडी परवानगी मिळवल्याचे गायकवाड यांनी सांगितले

मुलीच्या लग्नसोहळा कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यासंबंधी समाजकल्याण विभागाच्या अधिका-यांकडे तोंडी परवानगी मागितली होती. मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे अधिकारी स्पष्ट करताहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया समाज कल्याण आयुक्तांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT