PMC
PMC 
पुणे

भाजपने चुकीचे निर्णय घेण्याचा पायंडा रचला : चेतन तुपे

संदिप जगदाळे

हडपसर : राष्ट्रवादीची सत्ता असताना सहा प्रस्तावित मार्गात हडपसर पर्याय मेट्रो प्लॅनमधे घेतले आहे. पहिल्या टप्प्यात हे काम सुरू नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, मेट्रोचे सहाही मार्ग वेगळ्या बाजूला असल्याने एकावेळी मेट्रोचे काम सुरू करावे. पुणेकरांच्या वाहतूककोंडीचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा, अशी मागणी पुणे महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने बदल करून हडपसर वगळल्याने पुन्हा एकदा पूर्व भागावर अन्याय झाला आहे, हडपसरकरांच्या न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तुपे यांनी दिला. 

भाजप सत्ताधाऱ्यांमुळे मेट्रोचे काम चार वर्षे उशिरा सुरू झाले आहे. पुणेकरांना वाहतूककोंडीच्या खाईत ढकलण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता असताना शहरातील वाहतूकोंडी सुटावी म्हणून ८५ किलोमीटर मेट्रो मार्ग मंजूर करून घेतला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३१ किलोमीटर मेट्रोचे काम होणार होते. यात पिंपरी ते स्वारगेट व वनाज-रामवाडी मार्गाचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात कर्वेनगर, सिंहगड, हडपसर, कात्रज या मार्गांचे काम करण्यात येणार होते. मात्र, सत्ताधारी भाजपने सत्तेवर आल्यावर प्रस्ताव बदलून भैरोबनालावरून बंडगार्डनकडे मेट्रो वळविली आणि हडपसरला वगळल्याने पूर्व भागातील राष्ट्रवादी नगरसेवकांना धक्का बसला आहे.

आधी राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असताना हडपसरपर्यंत मेट्रो प्रस्तावित केली होती. पण भाजप सत्ताधाऱ्यांनी हडपसरचे काम सुरू केले नाही. कात्रजला वगळले होते पण राष्ट्रवादीच्या आग्रहास्तव कात्रजपर्यंत मेट्रो होत आहे. शिवाजीनगर व स्वारगेट, वनाज येथे मेट्रो स्टेशन होत आहे. 

स्वारगेट स्टेशन होत असताना हडपसरला मेट्रोचे काम सुरू करावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे चेतन तुपे यांनी सांगितले. 

हडपसरचा वाहतूक प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्ते अरुंद व वाहनांची संख्या अधिक म्हणून येथे मेट्रो होणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये नोकरीस जातात. पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न येथून मिळते, पण पीएमपीला मर्यादा आहेत. हडपसरवरून स्वारगेटला जाणे, तेथे वाहन पार्क करणे हे जिकिरीचे आहे. त्यामुळे स्वारगेट ते हडपसर व निर्धारित सर्व सहा मार्गांचे काम एकावेळी सुरु करावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे. 

भाजपने भैरोबनालापर्यंत मेट्रो करून हडपसरकरांची फसवणूक केली आहे. असा आरोप करीत हडपसरला मेट्रो करीत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हडपसर हे पुण्याच्या पूर्वेकडील पालिकेच्या शेवटच्या हद्दीतील उपनगर आहे. झपाट्याने वाढ होत असताना रस्ते व वाहतूक समस्या गंभीर बनत चालली आहे. येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे. खासगी वाहनांचा वापर त्यामुळे कमी होईल व वाहतूक समस्येवर मात करता येईल. भाजप संथ गतीने काम करीत आहे. एकावेळी सर्व मार्गांचे काम सुरू झाल्यास लवकर मेट्रो मार्ग होतील. 

तसेच पुणे शहर आणि उपनगर वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल. पूर्व भागावर कायम अन्याय झाला आहे. आता मेट्रो वगळल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT