10th
10th 
पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र संचालिका तथा विद्यालयाच्या प्राचार्या अलका परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाच्या वतीने परीक्षार्थींच्या स्वागतासाठी परीक्षाकेंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.

विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उरुळी कांचन व परिसरातील एकूण बारा शाळांचे मिळून १ हजार २६३ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती अलका परदेशी यांनी दिली. यामध्ये उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, एंजल हायस्कूल, कोरेगाव मुळ येथील अमर एज्युकेशन इंस्टीट्युट, सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालय, शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय, अष्टापूर येथील न्यू. इंग्लिश स्कूल, हिंगणगाव येथील लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय व दौंड तालुक्याच्या यवत येथील विद्या विकास मंदिर, बोरी भडक येथील सुभाष अण्णा कुल माध्यमिक विद्यालय, बोरी ऐंदी येथील शिवराम बापू कुदळे माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावेळी परीक्षा केंद्रावर सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्य्पक व अध्यापक उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक डी. के. टिळेकर, लता चव्हाण, के. बी. दिवेकर, ए. एस. पाटील व व्ही. बी. थिटे यांनी परीक्षा केंद्राचे नियोजन केले. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल व कन्या प्रशाला या परीक्षाकेंद्र व परीक्षा उपकेंद्रावर अनुक्रमे ५०० व ४६४ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक तथा हायस्कूलचे प्राचार्य एस. एम. गवळी यांनी दिली. यामध्ये लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरीअल हायस्कूल, कन्या प्रशाला, लोणी स्टेशन येथील सेंट तेरेसा, थेऊर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालय, न्यू. इंग्लिश मीडियम, आळंदी म्हातोबाची येथील म्हातोबा माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी एस. एम. गवळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कन्या प्रशालेच्या प्राचार्या सरोज पाटील, पर्यवेक्षक एस. बी. कामत, निजाम जमादार, एस. एस. खळदकर, एस. जे. धिमधिमे उपस्थित होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने उरुळी कांचन व लोणी काळभोर या दोन्ही परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT