BJP
BJP 
पुणे

पुण्यात भाजपमध्ये पुन्हा घराणेशाही 

सकाळवृत्तसेवा

पुणे : स्थायी समितीचे नवे सदस्य निवडताना भारतीय जनता पक्षाने दोन आमदारांच्या घरात पदे दिल्याने पक्षाने घराणेशाहीला थारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून पक्षातील जुन्या-नव्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे; तर या निवड प्रक्रियेत संभाव्य गटबाजी टळल्याचे सांगण्यात येत असले तरी, पक्षांतर्गत सुंदोपसुंदीला सुरवात होण्याची चिन्हे आहेत. 

काही अनुभवी सदस्यांऐवजी अनपेक्षित नावे जाहीर झाल्याने पक्षसंघटनेतही आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. चारपैकी दोघे महापालिका निवडणुकीच्या आधी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले असूनही त्यांना एवढ्या कमी वेळेत संधी दिल्याचे गाऱ्हाणे जुने कार्यकर्ते मांडत आहेत. "ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाचे स्वयंसेवक म्हणून काम केले, त्यांचा विसर पडला का,' असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. त्यामुळे भाजपमध्ये जुन्या-नव्यांवरून नव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. 

स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या आठपैकी भाजपच्या चार सदस्यांचा समावेश होता. या पदासाठी पक्षातील दोन डझन नगरसेवक इच्छुक होते. त्यातील अनुभवी आणि एका नव्याच्या नावाचा विचार होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली, मात्र आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री आणि ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांना संधी देण्यात आली. त्यापैकी मुळीक यांचे नाव आधीपासून चर्चेत होते; परंतु "एकाच घरात पदे नको' या भावनेतून त्यांच्या नावाचा फारसा विचार केला जाण्याची शक्‍यता नव्हती. टिळेकर यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले दिलीप वेडे-पाटील आणि उमेश गायकवाड यांना संधी देण्यात आली. यापैकी दोन जागा आमदारांच्या घरात गेल्याने अन्य इच्छुकांनी उघडपणे नाराजी मांडली. एवढेच नव्हे तर, घराणेशाही डोके वर काढण्याची भीती पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

मुळीक हे दुसऱ्यांदा निवडून आले असून, गेल्या पाच वर्षांत ते दोनदा स्थायीचे सदस्य होते; तर टिळेकर या आधीही निवडून आल्या होत्या. भाजपकडे बहुतांश सदस्य नवखे असल्याने स्थायी समितीत अनुभवी सदस्यांना संधी देण्याची मागणी पक्षातील एका गटाने लावून धरली होती; तर आगामी निवडणुका लक्षात घेऊन ज्या भागात पक्षाची ताकद कमी आहे, त्या भागातील सदस्यांना स्थायीत स्थान मिळेल, असेही सांगण्यात येत होते; पण दोघा आमदारांच्या घरात आणि दोन नव्या सदस्यांना संधी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

इच्छुकांची मोर्चेबांधणी 
महापालिकेतील सत्ता ताब्यात घेऊन भाजपला वर्षे पूर्ण झाले. या काळात पक्षांतर्गत गटबाजी लपून राहिलेली नाही. दरम्यान, स्थायी समितीचे सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील वेगवेगळ्या गटांतील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यातून इच्छुकांची यादीही वाढली. त्यामुळे मंगळवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत विविध चर्चा होती. परिणामी, गटबाजीची चर्चा रंगत असतानाच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दुपारी सव्वातीन वाजता मुळीक, टिळेकर, वेडे-पाटील आणि गायकवाड यांची नावे जाहीर करण्यात आली. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीतही नाराजी 
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधून अनपेक्षित नावे जाहीर झाल्याने या दोन्ही पक्षांतील सदस्यांमध्येही नाराजी असल्याची चर्चा होती. शिवसेनेडून मात्र अपेक्षित सदस्याला संधी दिल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन्ही महिला सदस्यांची नावे जाहीर केल्याने काही जण नाराज असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात आक्रमक होण्यासाठी अनुभवी सदस्यांना स्थान हवे होते, अशी अपेक्षा पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT