Hadapsar
Hadapsar 
पुणे

रस्त्यावर केमिकल सांडल्याने वाहनचालक घसरून पडले

संदिप जगदाळे

हडपसर (पुणे) : खासगी कंपनीचा केमिकल घेऊन चाललेल्या कंटेनरमधून केमिकल रस्त्यावर सांडल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. रविदर्शन सोसायटी ते पंधरा नंबर दरम्यान रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हडपसर पोलिसांनी आग्नीशामक दलाच्या मदतीने रस्ता स्वस्छ केला. दरम्यान या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. 

केमीकलचा ट्रक सोलापूरच्या दिशेने जात होता. यावेळी त्यातील केमिकलचे बॅरलमधून केमीकलची गळती सुरू झाली. नागरिकांनी चालकाला थांबवले तेव्हा नागरिक मारतील या भीतीने चालकाने गाडी सोडून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने अग्निशामक दलास कळवले. काही वेळातच अग्निशामक दलाचे शिवाजी चव्हाण व त्यांचे सहकारी कर्मचारी दाखल झाले.

केमीकलचा उग्र वास दूरवर पसरला होता. तसेच त्यामुळे नागरिकांची डोळ्यात मोठया प्रमाणात जळजळ होत होती. अखेर नागरिक निलेश सामल, सचिन मोरे, बाळासाहेब शिंदे, भीमा शिंदे यांनी पुण्याकडून लोणीकडे जाणारी वाहतूक बंद केली. व आग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला व रस्ता स्वच्छ केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान हडपसर पोलिसांनी संबधिक ट्रक ताब्यात घेतला असून याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT