illegal construction
illegal construction  
पुणे

पुणे-महंमदवाडी प्रभागात अनधिकृत बांधकामे वाढली

समीर तांबोळी

उंड्री (पुणे) : महंमदवाडी, हांडेवाडी रस्ता, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उंड्री परिसरात अनधिकृत बांधकामात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला अनाधिकृतरित्या पत्र्याचे शेड मारून भाड्याने देण्याचा व्यवसाय तेजीत आहे. बर्‍याच ठिकाणी सोसायटी समोर असणाऱ्या मोकळ्या जागेवर कब्जा करून दुकाने थाटली जातात. यास विरोध केल्यास सोसायटीधारकांना दमदाटी केली जात असल्याचे नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. महापालिकेचे संबधीत विभाग ही कामे रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

अनाधिकृत शेडमुळे वाहतूकीची समस्या, पादचार्‍यांचा प्रश्न वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अनाधिकृत बांधकामामुळे परिसराचे बकालीकरण होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागांनी यावर कारवाई करावी अशी मागणी फोशचे (या परिसरात असणार्‍या सोसायटयांची संघटना) अध्यक्ष वैभव माने यांनी केले असून संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

राजकीय हस्तक्षेप वाढला
या परिसरात महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जमीनी तसेच खासगी जागा यांच्या वर राजकीय व्यक्तींशी जवळीक असणाऱ्या व्यक्तीं अतिक्रमण / कब्जा करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे या कामांवर कारवाई होत नाही. बांधकामे पाडल्यावर थोड्या दिवसात पुन्हा उभारली जातात. यावर महापालिकेचा अंकुश रहिला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

अवैध शेडवर कार्यवाही
दरम्यान अशोक नगर समोरील जाग्यावर वीनापरवाना दुकानासाठी पत्राच्या शेडचे बांधकाम केले होते. दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी  FOHSSH चे अध्यक्ष वैभव माने व निलेश क्लासिक सोसायटी तर्फे महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. पुणे महापालिका संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले त्याची दखल घेत शेड पाडले. वैभव माने म्हणाले, आजूबाजूच्या परिसरात अजून अशी बरीच  अवैध बांधकामे,शेडस आहेत. त्यावर सुध्दा लवकरच कार्यवाही करण्याची विनंती महापालिकेला करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT