Bhigwan
Bhigwan 
पुणे

हरवत चाललेलं गावपण जपण्याची आवश्यकता : मधुकर पाटील  

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : पूर्वी खेडी ही खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होती व तेथे अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडत होते. गावातील तरुणांमध्येही जिव्हाळा, प्रेम व सुरक्षितता ही भावना होती. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध आविष्कारांमुळे व दूरदर्शनच्या वाढत्या प्रभावांमुळे ग्रामीण संस्कृतीवर शहरी संस्कृतीचे आतिक्रमण होत आहे.

खेड्यामध्येच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते म्हणुन खेड्यावर होत असलेले शहरी संस्कृतीचे अतिक्रमण रोखण्याची व हरवत चाललेलं गावपण जपण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील प्रा. मधुकर पाटील यांनी व्यक्त केले.

येथील अखिल भारतीय मराठा महासंघ संचलित छत्रपती शिवराय सावर्जनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सावधान गावाचं गावपण हरवत चाललंय या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माळेगांव येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार होते. भिगवणच्या माजी सरपंच संगिता थोरात,शंकरराव गायकवाड उपस्थित होते. प्रा. पाटील पुढे म्हणाले, पूर्वी गावांचे रस्ते कच्चे होते पण माणसे विचाराने पक्की होती, आता मात्र रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे व माणसे डांबरट झाली आहेत. त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण करण्याचा व लोकांना खेड्याकडे जाण्याचा सल्ला महात्मा गांधीजींनी दिला होता.

फ्लॅट संस्कृतीमुळे माणुस माणसांपासुन दुर चालला आहे. कुटुंबाचा व गावाचा एकात्म विचार करणे व आई वडिलांचा योग्य सन्मान करणे व निसर्गाची योग्य काळजी घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण संस्कृती आहे. ही संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामंचद्र पवार म्हणाले, छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जीवनाच्या प्रत्येक अंगावर व्याख्यानमालांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न होत आहे. गावाच गावपण हरवंत चाललंय या व्याख्यानांच्या निमित्ताने शिवकालीन काळामधील खेडी व आज बदलेली खेडी अशी तुलना शक्य होईल व त्यामधून लोकांना ग्रामीण संस्कृतीचे महत्व पटण्यास मदत होईल.

यावेळी कोंढार चिंचोली (ता.करमाळा,जि.सोलापुर) येथील संतोष शिंदे यांचा वडिलांच्या मृत्यूनंतर अवयव दानांमध्ये महत्वपूर्ण भुमिका बजावल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. जे. आर. खरड यांनी केले सुत्रसंचालन दिपक वाघ यांनी केले तर आभार पांडुरंग वाघ यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT