Saloni-Sanika
Saloni-Sanika 
पुणे

सलोनी जाधव व सानिका जाधव यांना ज्युदो स्पर्धेत कांस्य पदक

प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : भादलवाडी (ता. इंदापुर) येथील विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट इंग्लिश मीडियम स्कुलच्या सलोनी संतोष जाधव हिस पुणे महापौर चषक ज्युदो स्पर्धेत कांस्य पदक तर सानिका संतोष जाधव हिस जिल्हा स्तरीय ऑलंपिया इंटर स्कुल ज्युदो स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे. दोघी भगिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

पुणे महानगर पालिकेच्या वतीने पुणे येथे जिल्हास्तरीय पुणे महापौर चषक ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भादलवाडी (ता. इंदापुर) येथील विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट इंग्लिश मीडियम स्कुलच्या सलोनी जाधव हिने या स्पर्धेमध्ये 13 वर्षे वयोगटामधून सहभागी झाली होती. त्यामध्ये तिने कांस्य पदक पटकावले. महापौर मुक्ताताई टिळक, पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशनचे खजिनदार अनिल संकपाळ, आंतरराष्ट्रीय पंच रोहित टिळक, शैलेश टिळक, महाराष्ट्र राज्य ज्युदो कराटे स्पोर्ट अॅकॅडमीचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे यांचे उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

पुणे येथे जिल्हास्तरीय ऑलंपिया इंटर स्कूल ज्युदो स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये विद्या प्रतिष्ठाण इंग्लिश मिडीयम स्कूल बिल्ट भिगवण मधील सानिका संतोष जाधव ही इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी 9 वर्षे वयोगटातील 30 किलो वजन गटामध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये तिने कांस्य पदक पटकावले.  

दोघींना प्रशिक्षक दत्तात्रय व्यवहारे, जयश्री व्यवहारे, सागर बनसोडे, अजीनाथ बळगानोरे, सुनिल जाधव, ज्ञानेश्वर भोई, अनिल जाधव, ओम गडदे, अमोल शहाणे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजश्री व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या सरीता शिंदे, क्रिडाशिक्षक नवनाथ इंगळे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT