workers protest
workers protest 
पुणे

टाकवे बुद्रुक | 21 दिवसांपासून कामगारांचे आदोलन; सुचना न देता कारखाना स्थलांतरित

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक : येथील सिंडिकेट एक्झाॅस्ट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कारखाना स्थलांतरित करण्यापूर्वी कामगारांशी एक बैठक घ्यावी या मागणीसाठी २१ दिवसांपासून कामगार कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र अद्याप कारखाना व्यवस्थापनाने याकडे डोकावून पाहिले नाही, किमान एकदा व्यवस्थापनाने कामगारांचे म्हणणे ऐकून घ्यावे ही माफक अपेक्षा घेऊन कामगार प्रवेशद्वारावर बसून आहेत.

कोणतीच पूर्वसुचना न देता येथील कारखाना कर्नाटकातील धारवाडला स्थलांतरित करण्याची नोटीस व्यवस्थापनाने कामगारांना बजावली आहे.त्या दिवसापासून कारखाना बंद आहे,कारखान्यातील यंत्र उचलून व्यवस्थापन धारवाडला कारखाना सुरू करेल, व्यवस्थापनाने कामगारांना धारवाडला नोकरी करावी किंवा स्वेच्छेने राजीनामा द्यावा, असे पर्याय सुचविले आहे. पण हे पर्याय ना कामगारांशी चर्चा करून की ना कामगार प्रतिनिधीशी चर्चा करून, त्यामुळे आपली कैफियत कोणाकडे मांडायची अशा विवंचनेत असलेल्या कामगारांनी मावळचे तहसीलदार रणजित देसाई, वडगावचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, कामगार आयुक्त यांना या आशयाचे निवेदन या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. परंतु २१ दिवसात काहीच चर्चा नाही की तोडगा निघाला नाही.

व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी संतोष असवले, यशवंत शेलार, दिलीप गावडे, बाळासाहेब शिंदे, नवनाथ गाढवे, नितीन आगळमे, नितीन भांगरे, काळूराम घोजगे, महेश साबळे, अंकुश लोहट यांच्यासह सर्व कामगार आळीपाळीने प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत. कामगार उपायुक्तांनी या महिन्याच्या ८ व १४ तारखेला व्यवस्थापन आणि कामगारांना चर्चेसाठी बोलावले होते, पण व्यवस्थापनाने याकडे डोकावून पाहिले नाही, असे कामगार प्रतिनिधी संतोष असवले व सहकाऱ्यांनी सांगितले. या महिन्यात रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे, मुलांच्या शाळेच्या फी भरायची आहे, दवाखाना, शैक्षणिक खर्च, प्रवास खर्च करताना आखडता हात घ्यावा लागत आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा आम्ही उपोषण धरून बसू यातून सकारात्मक मार्ग न निघाल्यास आत्मदहनाचा इशारा कामगारांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT