मुंबई - मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, माउली दाभाडे, रोहिदास वाळुंज आदी.
मुंबई - मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमवेत चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, माउली दाभाडे, रोहिदास वाळुंज आदी. 
पुणे

मावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसची मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबईत झाली. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. तालुक्‍यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, माजी युवक अध्यक्ष रोहिदास वाळुंज, संभाजी राक्षे आदी उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी तालुक्‍यातील नेत्यांनी केली. मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार चार वेळा पराभूत झाला आहे. तालुक्‍यातील जनतेने या पक्षाला नाकारलेले आहे. काँग्रेसकडे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत. लोणावळा नगर परिषदेत सात, देहूरोड कॅंटोन्मेंट व तळेगावात पक्षाचे दोन नगरसेवक आहेत, तसेच दाभाडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढली आहे. या उलट लोणावळा व देहूरोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही, असा युक्तिवाद तालुक्‍यातील नेत्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मावळची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होत असताना ज्या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सलग दोन अथवा तीन वेळा पराभूत झाला आहे त्या मतदारसंघात फेरबदल करण्याचे दोन्ही काँग्रेसचे धोरण ठरले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिली. तालुक्‍यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची सूचनाही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT