PMRDA
PMRDA sakal
पुणे

महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीची (Pune Metropolitan Planning Committee) पहिली बैठक आज (२६ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या समितीच्या बैठकीत समाविष्ट २३ गावांसह पीएमआरडीएच्या हद्दीचा प्रारूप विकास आराखड्यास मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Meeting Metropolitan Planning Committee chaired uddhav thackeray)

पीएमआरडीएच्या (PMRDA) हद्दीतून वगळून २३ गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करणे, त्या पाठोपाठ या गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती करणे आणि त्यानंतर पुणे महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीची पहिली बैठक सोमवारी आयोजित केली आहे. महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यापूर्वीच पीएमआरडीएने हद्दीचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्यास पुणे महानगर नियोजन समितीची मान्यता आवश्‍यकता आहे.

मात्र, समितीच अस्तित्वात नसल्यामुळे विकास आराखड्याचे काम थांबले होते. परंतु राज्य सरकारने गावे समाविष्ट करण्यापासून ते पुणे महानगर नियोजन समिती स्थापन करण्याचे एकापाठोपाठ निर्णय घेऊन महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दणके दिले. असे असताना समिती स्थापन होऊन चार दिवस होत नाहीत, तोच पहिली बैठक सोमवारी होत असल्याने महाविकास आघाडीने भाजपला तिसरा दणका देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच या गावातील नागरिकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT