Bala-Bhegade
Bala-Bhegade 
पुणे

अनुदानाबाबत लवकरच बैठक - आमदार बाळा भेगडे

सकाळवृत्तसेवा

तळेगाव दाभाडे - ‘येथील संरक्षण संशोधन व विकास यंत्रणेच्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली होती. बाधितांना पुनर्वसनविषयक पॅकेज देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याअंतर्गत पुनर्वसन सानुग्रह अनुदान वाटप करण्याबाबत मुख्यमंत्र्याबरोबर दोन दिवसांत बैठक होणार आहे,’’ अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

प्रकल्पासाठी २००४ मध्ये सुमारे पाचशे एकर जमीन संपादित केली होती. देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाचा प्रकल्प असल्याने शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र एकरी अवघे दोन लाख २० हजार रुपये नुकसानभरपाई शेकऱ्यांना दिली होती. त्यामुळे शेतकरी संतप्त होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत झालेल्या बैठकीनंतर पुनर्वसनविषयक विशेष पॅकेज देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून संरक्षण विभागाकडे पाठविला होता.

१२ जानेवारी २००७ रोजी पुनर्वसनविषयक स्वानुग्रह अनुदान प्रति हेक्‍टरी साडेपाच लाख रुपये मंजूर करून संरक्षण विभागाने काही अटीस अधीन राहून वाटपास मंजुरी दिली होती. सानुग्रह अनुदान आक्षेप न करता घेता येईल, वाढीव नुकसानभरपाई रकमेसाठी न्यायालयात जमिनीसंदर्भात दाखल केलेला दावा काढून घ्यावा. तसेच न्यायालयाकडील आदेशाची त्याची प्रत सादर केल्यानंतरच अनुदान अदा करण्यात येईल. कोणत्याही तरतुदीनुसार वाढीव रकमेसाठी भविष्यात कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करणार नाही, अशा स्वरूपाचे बंधपत्र सादर केल्यानंतरच अनुदानाची रक्कम देण्यात येईल आदी अटी त्या वेळी घातल्या होत्या. या अटी जाचक असून प्रकल्पगग्रस्तांचा न्यायालयीन हक्क डावलणारा असल्याने शेतकऱ्यांनी अनुदान स्वीकारले नव्हते. ही रक्कम १२ वर्षांपासून सरकारच्या तिजोरीत पडून आहे. शेतकरी जमिनीच्या भाववाढीसाठी न्यायालयात गेले असून अंतिम निर्णय प्रलंबित आहे. एकीकडे जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुसरीकडे उत्पन्नाचे साधन नाही. मंजूर अनुदान वाटपाअभावी पडून आहे. या बाबत अनेक वर्षे शेतकरी स्थानिक आमदार व खासदारांकडे हेलपाटे मारून वैतागून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बाळा बेगडे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा मंगळवारी (ता. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

दिवाळीत भेट शक्‍य
दोन दिवसांत मुख्यमंत्री, आमदार, शेतकरी प्रमुख प्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली आहे. हा प्रश्न या बैठकीत निकाली काढून अनुदानवाटपाची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, असा विश्‍‍वास आमदार बाळा भेगडे यांनी व्‍यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT