pune-motha-Mee-too.jpg
pune-motha-Mee-too.jpg 
पुणे

#MeToo : मुठा म्हणतेय, हो, मी पण पीडित!

सकाळवृत्तसेवा

पुणे :  ''हो, मी पीडित आहे. '#MeToo' अशा आशयाचे फलक पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर लावण्यात आला आहे. हा फलक पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीचं वास्तव मांडणारा आहे. '#MeToo' मोहिमेच्या अंतर्गत आता पुण्यातील नद्यांवर, त्यांच्यावरील अत्याचाराविरुध्द आवाज उठवला आहे. आज मुळा-मुठा नद्यांची अवस्था अत्यंत भीषण झालेली आहे. या नद्या अक्षरश: गटारगंगा झाल्या आहेत. 

''गेली कित्येक दशक हे माझ्या संमतीशिवाय होत आलय, कधी माझ्या गर्भातूनवाळु उपसा तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रुपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी. ''हो मी पीडित आहे  '#MeToo' या आशयातून नद्यांनी आपल्यावरही अत्याचार होत असल्याची भावना जणू व्यक्त केली आहे. तसेच ''नदी प्रदुषित अथवा कोणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदुषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम (277)च्या अंतर्गत 3 महिने कारावास, दंड किंवा दोन्ही कलमास पात्र राहील'' अशी चेतावणी देखील फलकावर दिली आहे. 

नदीपात्रात लावलेली ''हो मी पीडित आहे. '#MeToo' या आशयाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. '#MeToo' मोहिमेच्या अंतर्गत पुण्यातील नद्यांच्या दुरवस्थेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नद्यांवरुन वाहणारे '#MeToo'चे वारे कोणत्या दिशेला वाहतील? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT