Metro
Metro 
पुणे

मेट्रोचे गर्डर तीन ठिकाणी तयार होणार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान होणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारे गर्डर तयार करण्यासाठी तीन ठिकाणी कास्टिंग यार्ड (मोकळी जागा) उभारण्यात येणार आहे. आयटी पार्क परिसरातील माण, मारुंजी आणि बालेवाडी भागात प्रत्येकी दहा ते बारा एकर जागेवर हे यार्ड उभे करण्यात येणार असून, यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेमध्ये सरकारी आणि खासगी जागेचा समावेश आहे. 

मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रोसाठी आवश्‍यक असणारे गर्डर तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये या कामाला सुरवात होणार असल्याचे पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान प्रस्तावित असणारी मेट्रो एलिव्हेटेड राहणार आहे, त्यामुळे कास्टिंग यार्डमध्ये गर्डरचे काम पूर्ण सुरू झाल्यानंतर मेट्रोचे काम वेगात पूर्ण करणे शक्‍य होणार आहे. दरम्यान, हिंजवडी ते बालेवाडी दरम्यानच्या बारा किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रकल्पाचे काम २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगरपर्यंतचे उर्वरित अकरा किलोमीटर अंतराचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर बालेवाडीपर्यंतचे काम वेळेत पूर्ण झाल्यास आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी ते सोईस्कर ठरणार आहे.

  कास्टिंग यार्डची जागा : ३० ते ३५ एकर 
  मेट्रोचे अंतर : २३ किलोमीटर 
  प्रस्तावित स्थानकांची संख्या : २३
  प्रकल्प पूर्ण करण्याचा अवधी : तीन वर्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT