criminal arrested
criminal arrested esakal
पुणे

MHADA TET Case : तीन महत्त्वाच्या दलालांना बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने लातूर येथून दोघांना तर नाशिक येथून एकास अशा तीन महत्त्वाच्या दलालांना ताब्यात घेतले.

पुणे - म्हाडा (Mhada) व शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) (TET) पेपरफुटी (Paper Leakage) व उमेदवार पात्र करण्याच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर पोलिसांच्या पथकाने लातूर येथून दोघांना तर नाशिक येथून एकास अशा तीन महत्त्वाच्या दलालांना ताब्यात (Agent Arrested) घेतले. लातुरमधून अटक केलेल्या दोघांनीही उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये जमवून ते हरकळ बंधूंमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचविल्याची माहिती पुढे आली आहे.

म्हाडाच्या प्रकरणामध्ये जमाल इब्राहिम पठाण (वय ४७, रा. जळगपूर, लातुर), कलीम गुलशेर खान (वय ५२, रा. बुलडाणा) या दोघांना अटक केली आहे. तर, टिईटी प्रकरणी मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३३ , रा. नाशिक) यास अटक केली आहे. म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख समवेत अटक केलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी दलालांमार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे व शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याशी संगनमत करून गैरव्यवहार केला होता. याच हरकळ बंधूंना पठाण, खान व सूर्यवंशी यांनी कोट्यवधी रुपये दिल्याचे पोलिसांच्या चौकशीत माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. खान व पठाणचा शोध सुरू होता.

म्हाडा परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी अटक केलेले खान व पठाण हे दोघेही महत्त्वाचे दलाल आहेत. तसेच म्हाडाच्या पेपरफुटीसाठीही त्यांनी सात ते आठ जणांशी संपर्क साधला होता. तर २०२१ च्या टिईटी परीक्षेसाठीही उमेदवारांना पात्र करण्यासाठीची यादी तयार केली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक पठाणच्या शोधासाठी लातूर येथे गेले होते. त्यास ताब्यात घेतल्यानंतर मुळचा बुलढाण्याचा असलेला कलीम खान हा देखील पोलिसांपासून लपण्यासाठी लातूरमध्ये त्यालाही अटक केली. टीईटीप्रकरणी अटक केलेला सूर्यवंशी हाही या प्रकरणातील महत्त्वाचा दलाल आहे. त्यास पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. न्यायालयाने पठाण, खान या दोघांना २४ फेब्रुवारीपर्यंत, तर सूर्यवंशीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT