PMRDA
PMRDA 
पुणे

म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’चे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’बद्दल (नगररचना योजना) अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या टीपी स्कीमवर राज्य शासनाने लवाद म्हणून माजी सनदी अधिकारी धनंजय खोत यांची नियुक्ती केली आहे. 

पीएमआरडीएकडून म्हाळुंगे-माण येथे ७०० एकरमध्ये मागील एक वर्षापासून जमीनमालकांना बरोबर घेऊन टीपी स्कीमचे काम सुरू आहे. पीएमआरडीएने या पहिल्या टीपी स्कीममध्ये ‘म्हाळुंगे हायटेक सिटी’ स्थापन करण्याचे ठरविले आहे. सध्या या भागात रस्ते व भूखंडांचे आरेखन व मोजणी सुरू आहे. वीज, पाणी, रस्ते आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शेजारीच हिंजवडी आयटी पार्क असल्याने येथेसुद्धा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, रहिवास तसेच वाणिज्यिक क्षेत्र विकास करण्यासाठी मोठी संधी आहे.

पायाभूत सुविधांमधील होणाऱ्या कामांची माहिती जमीनमालकांना देण्यासाठी; तसेच त्यांच्याकडून सूचना प्राप्त करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता बालेवाडी येथील मिटकॉन येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी जागामालकांनी उपस्थित राहावे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT