Milk
Milk 
पुणे

दुधाचा चटका

मनोज कापडे

गेल्या वर्षी २८०० कोटींचा तोटा
पुणे - उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात दुग्ध क्षेत्राला २८०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे बाजारभाव सावरण्याची शक्यता नसल्याने तोटा आणखी वाढेल, असा इशारा डेअरी उद्योगाने दिला आहे. 

देशातील दूध पावडर लोण्याच्या साठ्यामध्ये भरमसाट वाढ होत आहे. देशात सध्या तीन लाख टन दूध भुकटी विक्रीअभावी पडून आहे. लोण्याचे साठेदेखील एक लाख टनाच्या आसपास पोचलेले आहेत. ‘‘दूध पावडर (भुकटी) व बटरचा (लोणी) साठा विकून डेअरी उद्योगाकडे पुरेसा पैसा येत नाही तोपर्यंत दुधाचे दर शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याची शक्यता वाटत नाही,’’ असे दुग्धप्रक्रिया उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात खासगी दुधाच्या बाजारपेठेवरील घडामोडींवर सहकारी दूध संघांचे दर ठरतात. शासनाने प्रतिलिटर २७ रुपये दर शेतकऱ्यांना देण्याचे बंधन घातले असले तरी सध्या खासगी व सहकारी संघांकडून दुधाला १८ ते २४ रुपये दर दिला जात आहे. ‘‘पुणे जिल्हा सहकारी दूध संघ यापूर्वी २२.४० रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करीत होता. त्यात आता एक रुपयाने कपात करण्यात आली आहे. खासगी डेअरीचालकांनी १८ ते १९ रुपयांनी दूध खरेदी सुरू केली आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. केंद्र सरकारने ७५ टक्के अनुदान व राज्य सरकारने २५ टक्के वाटा उचलून दुधाला हमी दर द्यावा, असा उपाय डेअरी उद्योगाने सुचविला आहे.  

२७ रुपये सरकारी प्रतिलिटर दर
१८ ते २४ रुपये प्रत्यक्षात मिळणारा दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT