पुणे

सोनचाफ्याच्या शेतीने पुरंदरच्या शेतकरी कुटुंबियावर पैशांचा पाऊस 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : चांबळी (ता. पुरंदर) येथील देवराम यदु कामठे व कुटुंबियांनी सतरा वर्षांपूर्वी लावलेल्या सोनचाफ्याच्या फुलशेतीतून जणु.. त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण सुगंध दरवळतोय. केवळ दिड एकरातील 800 झाडांतून वर्षाला खर्च जाऊन 10 ते 15 लाख रुपये घरात येतात. आता देवरामच्या आई, पत्नी, भावजय यांनी या फुलशेतीत झोकून दिल्याने.. त्यांचे वडील, भाऊ व ते स्वतः हाॅटेल, रसवंती, चहा आदी व्यवसायात वेळ देऊन आणखी प्रगतीची भरारी घेत आहेत. 

चांबळी (ता. पुरंदर) येथे सासवड - कोंढवामार्गे पुणे रस्त्यालगत यदु कामठे यांची पावणेदोन एकर शेती आहे. अल्पभूधारकच. रस्त्यालगत घर व घरामागे शेती. इतर पारंपरीक पिकाचा नाद सोडून मुलगा देवराम कामठे यांनी कोकणात जाऊन सोनचाफा फुलशेतीचा अभ्यास केला. त्यातून सन 2003 मध्ये केवळ दिड एकरवर पिवळा 650, पांढरा 100 आणि केशरी 50 अशी एकुण 800 सोनचाफा झाडे लावली. सुमारे 60 ते 120 रुपये प्रती रोप खर्च आला. प्रथमपासून शेणखत, निंबोळी पेंड, लेंडीखत, हड्डी चुरा व गरजेनुसार पाणी देत राहीले. मावा, तुडतुडे, बुरशीजन्य रोगांसाठी वेळेवर फवारण्या नियमित असतात. छाटणी, आळी चाळणी, रिंग करुन अन्यद्रव्य दिली जातात. यातून दुसऱया वर्षी फुले येणे सुरु झाले. तिसऱया वर्षी उत्पादन जोमात सुरु झाले. आज गेली 15 वर्ष या सोनचाफ्याने जीवनात जणु अर्थपूर्ण सुगंध दरवळतोय. 

रोजच्या तोड्यात उन्हाळ्यात पाच ते दहा हजार फुले, पावसाळ्यात 15 ते 20 हजार फुले मिळतात. थंडीत मात्र 200 ते 600 फुले मिळतात. मार्केटमध्ये आवक वाढली तर 10 फुलांचे पाकीट कधी तीन ते दहा रुपयाला जाते. आवक मंदावली तर वीस ते तीस रुपये पाकीटामागे मिळतात. सण - उत्सव काळात तेच पाकीट 40 ते 50 रुपयांपर्यंत विकले जाते. सुरवातीला काही वर्षे देवराम व त्यांचे बंधू संभाजी स्वतः मार्केटमध्ये जाऊन फुल विक्री करायचे.

आता पाकीटे पाठविली.. तरी फुले तेथील यंत्रणेमार्फत खपलीच जातात. वर्षाला सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च जाऊन किमान 10 लाख व कमाल 15 लाख रुपये निव्वळ नफा यातून मिळतो. देवराम यांच्या आई सौ. मंगल, पत्नी सौ. सीमा, भावजय सौ. सुजाता, मुलगा धिरज आदी आता तोडणी, पॅकींगला रोज हातभार लावतात. त्यातून देवराम, त्यांचे वडील, भाऊ यांना इतर व्यावसायात जाऊन प्रगती करता येत आहे. बोपगावला एक हाॅटेल, पुण्यात रसवंतीगृह, फ्रुट ज्युस सेंटर, सेंद्रीय गुळाचा चहा दुकान आदी व्यवसाय जोमाने चालत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

*गंधीत सौंदर्य म्हणजे सोनचाफा * चार फुले घरात ठेवली तर फुले सुकेपर्यंत घरभर सुगंध दरवळत राहतो  * शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका  * कलम जातीवंत मातृवृक्षावर भेट कलम पद्धतीने करतात * यातील फुलांचा गडद पिवळा, गडद केशरी, किंवा सिमाचल केशरी, पांढरा रंग मार्केटमध्ये बऱयापैकी चालतो *लागवडीस जमिन निचऱयाची, सुर्यप्रकाश भरपूर, हवा खेळती लागते * भरपूर पाऊस व आर्द्रतेच्या परिसरात याची चांगली वाढ होते * बारमाही पाणी असेल तर लागवड कधीही करता येते * वर्षानंतर फुले येणे सुरु होते, तीन वर्षानंतर पूर्ण उत्पादन हाती येते  * इतर वेळी कमी-अधिक फुले.. मात्र चांगला हंगाम उन्हाळ्यात व पावसाळ्यात 180 दिवस सापडतो *

व्यावसायिक फुलशेतीत प्रगतीने पुढे जाण्याची क्षमता सोनचाफ्यात आहे. मात्र सोनचाफा लावून मोकार हिंडून चालत नाही, दुर्लक्ष केले तर तीच झाडे तोडावीही लागल्याचे मी कित्येक प्रकार पाहीले आहेत. त्यासाठी यातील पिक व्यवस्थापन, देखभाल, फुले तोडणी, पॅकींग व मार्केटींग याला रोज अधिक वेळ द्यावा लागतो. वर्षातून एकदा छाटणी, उन्हाळ्यात आठ दिवसाला पाणी, इतर वेळी पंधरा दिवसाला पाणी लागते. पावसाळ्यात पाण्याची गरज नसते.(-देवराम यदु कामठे, चांबळी, ता. पुरंदर)  

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT