चिंचवड - शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांना दुचाकी पार्किंगसाठी बंदी केल्याने मोकळा झालेला रस्ता.
चिंचवड - शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांना दुचाकी पार्किंगसाठी बंदी केल्याने मोकळा झालेला रस्ता. 
पुणे

अल्पवयीन मुलांना दुचाकीस मनाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - केंद्र सरकारने वाहन चालविण्याचे नियम कडक केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांश खासगी शाळांच्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन येण्यास शनिवारपासून (ता. १४) सक्त मनाई केली आहे.

वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहन चालविण्याच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या रकमेत वाढ केली आहे. हरियानासह अन्य काही राज्यांनी केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. 

विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्रातही लागू होण्याची शक्‍यता आहे. अल्पवयीन मुलांनी दुचाकी चालविल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी संबंधित मुलांच्या दहा पालकांना अटक केली आहे. त्याची खासगी शाळांनी गंभीर दखल घेतली आहे.

शहरात सुमारे ७० कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यापैकी बहुतांश शाळांना संलग्न आहेत. त्यामुळे मुलांना शाळांप्रमाणेच शिस्त लागण्यास मदत होते. महाविद्यालयात जाताना अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यांच्या दुचाकीवर जातात. केंद्र सरकारच्या नियमाचा त्यांच्यावर फारसा फरक पडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT