वडगाव - दोन कालव्यांमध्ये साकारण्यात येत असलेले ‘मिस्ट्री सफारी उद्यान’.
वडगाव - दोन कालव्यांमध्ये साकारण्यात येत असलेले ‘मिस्ट्री सफारी उद्यान’. 
पुणे

वडगावात साकारतेय ‘मिस्ट्री सफारी गार्डन’

जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता - वडगाव परिसरात खास लहान मुलांसाठी ‘मिस्ट्री सफारी गार्डन’ साकारण्यात येणार असून, ही बाग लहान मुलांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच ठरणार आहे.

हिंगणे, विठ्ठलवाडी, माणिकबाग, वडगाव (प्रभाग क्र.३४) भागात एकही उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांना इतरत्र जावे लागते. मात्र, आता वडगावमधील नागरिकांसाठी हक्काचे उद्यान बनविले जात आहे. दोन कालव्यामधील दीड एकर जागेत हे उद्यान साकारण्यात येत आहे. माणिकबाग डीपी रस्ता परिसरातील सोसायट्यांना हे उद्यान जवळ आहे. या उद्यानामुळे सिंहगड रस्त्याला नवा आयाम मिळणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उघड्या कालव्याच्या बाजूस संरक्षित जाळी बसविण्यात आली आहे. तर बंद पाइप लाइन शेजारी संरक्षित भिंत असणार आहे. या भिंतीला लागूनच विविध झाडे लावली जातील. या उद्यानासाठी नगरसेवक श्रीकांत जगताप, मंजूषा नागपुरे, हरिदास चरवड यांनी पाठपुरावा केला. यासाठी उद्यान विभागाच्या वतीने उद्यान अधीक्षक संतोष कांबळे, पर्यवेक्षक सुभाष पारटे, निरीक्षक सर्जेराव काळे आदी काम पहात आहेत.

केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठीदेखील हे उद्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण येथील जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जीमचा उपयोग होणार आहे, असे नागरिक कालिदास मते यांनी सांगितले.

या परिसरात उद्यान नसल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लागते. याचाच विचार करून खास मुलांना खेळण्यासाठी आणि मोठ्यांच्या आरोग्यासाठी हे उद्यान तयार केले जात आहे. येत्या मार्चपर्यंत हे उद्यान तयार केले जाईल. उद्यानाच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. 
- श्रीकांत जगताप, नगरसेवक

उद्यानात कोनोकार्पस जातीची झाडे, तैवान जातीची हिरवळ व बाराही महिने फुले येणारी झुडपे लावण्यात येतील. त्यामुळे उद्यान नेहमीच हिरवाईने नटलेले असेल. याचा वातावरणावर सकारात्मक परिणाम होईल. 
- अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

आमच्या परिसरात उद्यान नव्हते. या उद्यानामुळे मुलांना खेळण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होणार आहे. खेळण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. 
-  ज्योती देसाई, नागरिक

मार्च महिन्यात नागरिकांसाठी खुले
दीड कोटी रुपयांचा निधी

असे असेल उद्यान
या उद्यानात तीन टापू, लहान मुले व मोठ्यांसाठी स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रॅक’ तयार करण्यात येईल. टापूंच्या भोवती संपूर्ण हिरवाई असेल. मुलांसाठी बालोद्यान तसेच ओपन जीम तयार करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT