develop device for oil line cleaning
develop device for oil line cleaning sakal
पुणे

Pune News : तेलवाहिनीच्या स्वच्छतेसाठी एमआयटीचे उपकरण

सम्राट कदम

पुणे - तेल वाहिनीच्या स्वच्छतेसाठी रिअल टाईम माहिती देणारे उपकरण एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. ज्यामुळे तेल कंपन्यांचे शेकडो डॉलर्स वाचणार आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाला उपकरणासाठी स्वामित्व हक्क (पेटंट) देखील प्राप्त झाला आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इनलाईन इन्स्पेक्शन टूल (सिली) उपकरण विकसित केले आहे. इंटरनेट प्रणालीवर आधारित (आयओटी) हे उपकरण तेल वाहिन्यातील अडथळे दूर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

पृथ्वीराज पाटील, स्लाविन मस्करेन्हास, विराज जिवाणे, अश्वजीत पवार, दीपक कुमार यादव आणि रिया हुद्दार या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक विघ्नेश शेणॉय, संकेत शिंदे आणि स्नेहल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपयोजित संशोधन केले आहे.

उपकरणाबद्दल पृथ्वीराज पाटील सांगतो, ‘तेल वाहिनीमध्ये अनेकवेळा मेणासारखा थर जमा होतो. पर्यायाने प्रवाहात अडथळा निर्माण होत कंपन्यांचे नुकसान होते. हा थर काढण्यासाठी संपूर्ण वाहिनीच खोलावी लागते. तसेच या काळात इतर प्रक्रिया देखील बंद राहतात.’ एका विशिष्ट लांबीच्या तेल वाहिनीसाठी जवळपास ५० हजार डॉलर्स एवढा खर्च येतो. तसेच स्वच्छतेच्या कालावधीसाठी काही प्रक्रिया बंद ठेवाव्या लागतात.

या मुळे अजूनच खर्च वाढतो, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या समस्येसाठी २०१९ च्या हॅकेथॉनमध्ये एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातूनच सिली हे उपकरण विकसित झाले आहे. उपकरणांसाठी विद्यापीठाने २०२१ साली अर्ज केला होतो. नुकतेच त्याला भारतीय पेटंट कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

सिली उपकरणाचे वैशिष्ट्ये -

- तेलवाहिनीत जमलेल्या मेणाच्या जाडीबद्दल सिली उपकरण रिअल-टाइम माहिती प्रदान करते.

- संवेदकांमुळे (सेन्सर) मेणाचा थर नक्की कोठे जमा झाला हे लक्षात येते.

- किती दिवसानंतर किती थर वाढेल हे गणित करून खरंच पाईप साफ करायची गरज आहे का? हे सांगते.

- खूप मोठ्या प्रमाणावर थर जमा झाल्यावर स्वच्छता केल्यास खर्च वाचतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT