पुणे

आमदार कदमच्या पत्नीला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह दोघांना नवी मुंबईच्या कोकण भवन गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे आरोपींची संख्या १४ झाली आहे.

रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय ३०, रा. पैठण) व प्रतिभा रमेश कदम (वय ४०, रा. बोरीवली, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गाडेकर हा दोन दिवसांपूर्वी स्वतः सीआयडीसमोर हजर झाला. तर प्रतिभा यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.

चार वर्षांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविताना रमेश कदम याने संगनमताने ३८५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला. त्यानंतर सीआयडीने यात सहभागी असलेल्या बारा जणांना यापूर्वीच अटक केली आहे. आमदार कदम सध्या ठाणे येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

गाडेकर व कमलाकर ताकवले या दोघांनी भागीदारीत औरंगाबाद येथील सेठी ब्रदर्सचा कारखाना विकत घेतला होता. त्यासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. या व्यवहारासाठीचे पैसे महामंडळाचे होते. सीआयडीचे पथक गाडेकर व ताकवले यांच्या मागावर होते. आमदार कदमने गैरव्यवहारासाठी वापरलेले बॅंक खाते संयुक्त असून, त्यामध्ये त्याच्या पत्नीचे नाव होते. या खात्याचा वापर कदमची पत्नी करीत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी नावे उघड होण्याची शक्‍यता
अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत न्यायालयात तीन ते चार दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. गाडेकर व प्रतिभा कदम यांच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. याबरोबरच यातील आणखी काही महत्त्वाची नावेही पुढे येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT