पुणे

मोरगाव जेजुरी रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी

सकाळवृत्तसेवा

बारामती : राज्यातील दोन अत्यंत महत्वाच्या देवस्थानांना जोडणारा मोरगाव जेजुरी हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. 

मोरगावपासून जेथे बारामती विभागाची सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द संपते तेथपासून ते थेट जेजुरी नीरा रस्त्यापर्यंत पावसाने या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. बारामती व इंदापूर परिसरातून पुण्याला जाण्यासाठी दररोज हजारो लोक या रस्त्याचा वापर करतात. या सर्वांना विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना मोठीच कसरत करावी लागते. 

अष्टविनायकातील पहिले स्थान म्हणून मोरगावला भाविक येतात तर खंडोबारायासाठी लोक जेजुरीला येतात. येथे येणा-या भक्तांची या रस्त्यामुळे कमालीची गैरसोय होत आहे. 

रस्त्यांची कामे सुरु होणार...

जेजुरी ते मोरगाव व मोरगाव ते बारामती या दोन्ही रस्त्यांची कामे दिवाळीपर्यंत सुरु होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. जेजुरी मोरगाव सुपे हा रस्ता तसेच मोरगाव बारामती इंदापूर नीरानरसिंगपूर हा रस्ता पूर्णपणे नव्याने डांबरीकरण केला जाणार आहे. त्यातही मोरगाव ते बारामती हा रस्ता बारा मीटर म्हणजेच तीन पदरी होणार आहे.

जेजुरी ते मोरगाव या रस्त्याचेही काम लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून, या रस्त्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

किमान खड्डे तरी भरुन घ्यावेत

या रस्त्यावरुन प्रवास करणा-यांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागते. चारचाकी व दुचाकी गाड्या खड्डयात आपटून कमालीचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. यात वाहनांचे नुकसान, इंधनाचा अतिरिक्त खर्च व अपघाताचा धोका असल्याने या रस्त्यावरील खड्डे तरी किमान भरुन घ्यावेत अशी लोकांची मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT