mount manaslu
mount manaslu sakal
पुणे

एव्हरेस्टरनंतर खुणावतेय माऊंट मनास्लू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकाच वर्षात जगातील तीन अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्याचे खडतर ध्येय वडगावशेरी येथील एव्हरेस्टवीर जितेंद्र गवारे याने ठेवले आहे. यावर्षी त्याने माउंट अन्नपुर्णा ( Mount annapurna) आणि एव्हरेस्टवर तिरंगा (indian flag) फडकवला होता. आता माऊंट मनास्लू ( Mount manaslu) तो सर करणार असून असे करणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. याकरीता त्याला आता गरज आहे ती पुणेकरांच्या शुभेच्छारूपी आर्थिक पाठिंब्याची.

पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेमार्फत आखण्यात आलेल्या मोहिमेत विविध शिखरांवर चढाई करणारा जितेंद्र गवारेचा आजपर्यंतचा आलेख नेहमी चढता राहिला आहे. मागच्या वर्षी 2019 मध्ये त्याने भारत नेपाळ सिमेवरील जगातील तिसरे उंच शिखर कांचनजुंगा (8586 मी) सर केले होते. त्यानंतर न थांबता त्याने लगेचच माउंट अन्नपुर्णा (8091मी ) आणि जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टला (8848) गवसणी घातली. तीन अष्ठहजारी शिखरे यशस्वीरित्या सर केल्याच्या यशानंतर हुरळून न जाता त्याला आता जगातील आठवे उंच शिखर माउंट मनास्लू (8163मी) खुणावते आहे.

अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्याची आव्हाने वेगळीच असतात. हाडे गोठवणारी थंडी, ताशी 60 किमी वेगाने वाहणारे वारे, सतत सुरू असणारा हिमवर्षाव आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण एक ते दोन टक्के इतके असते. अशा आव्हानांचा सामना करून यश मिळवणे म्हणजे अद्भुत कामगीरी ठरते.

या मोहिमेचे मार्गदर्शक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे म्हणाले, ओलंपिकमध्ये पदके मिळवून खेळाडूंनी सर्व देशवासियांना ऊर्जा देणारी कामगिरी केली.त्याचप्रमाणे देशवासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी जितेंद्रही नक्की करेल. त्याने चांगली तयारी केली आहे. परंतु यासाठी येणाऱ्या खर्चाचे मोठे आव्हान समोर आहे.

एकात वर्षात तीन अष्टहजारी शिखरांना गवसणी घालण्याचे माझे स्वप्न असून त्यातील दोन टप्पे मी पार केले आहेत. माउंट मनास्लू सर केल्यास असे करणारा पहिला भारतीय ठऱण्याची संधी मला मिळेल. यासाठी पुणेकरांच्या पाठिंब्याची मला गरज आहे.

- जितेंद्र गवारे , एव्हरेस्टवीर गिर्यारोहक, (संपर्क 93703 30220)

जितेंद्रची कामगिरी (वर्ष, शिखर, उंची)

  • 2017- माउंट नून (7135 मी)

  • 2017- माउंट कॅथेड्रल (6000मी)

  • 2019- माउंट कांचनजुंगा (8586मी)

  • 2019- माउंट अमाद्बलम (6814मी)

  • 2021- माउंट अन्नपुर्णा (8091मी)

  • 2021-माउंट एव्हरेस्ट (8848मी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

SCROLL FOR NEXT