नारायण राणेंना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

Narayan-Rane
Narayan-Raneesakal

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (narayan rane statement on cm Uddhav thackeray)केलेली टीका त्यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र आहे. त्यावरून सध्या राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांना अटक करण्याची तयारी असताना त्यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात (ratnagiri session court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, रत्नागिरी सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याची सूत्रांची माहिती आहे. या वृत्ताला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तसेच आम्ही उच्च न्यायालयात जाऊन जामीन मिळवून घेऊ, असे दरेकर म्हणाले.

Narayan-Rane
नारायण राणे ऑक्सिजनवर, आम्ही त्यांची हवा काढली - शिवसेना

राणेंचा जामिन फेटाळल्याची मला देखील माहिती मिळाली आहे. आम्ही तो जामिन आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन मिळवून घेऊ. कायदेशीर लढाई उच्च न्यायालयात लढू, असे दरेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या मनात पोटशूळ निर्माण झाला होता. राणेंनी स्वभावानुसार, राणेंनी वक्तव्य केलंय. ते चुकीचंच आहे. पण, भाजप राणेंच्या मागे ताकदीने उभे राहील. काहीही झाले तरी भाजपची जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. त्यासाठी मी रत्नागिरीला जात असल्याचेही दरेकर म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण? -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, यावेळी त्यांची जीभ घसरली. 'मी असतो तर कानाखालीच चढवली असती' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटले असून भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आमनसामने आले आहेत. तसेच नाशिक, पुण्यात नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना अटक करण्याचे आदेश देखील काढले आहेत. त्यासाठी नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com