congress
congress 
पुणे

जिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडा : सातव

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्‍या काँग्रेसच्‍या सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (ता.१४) दिल्‍याचे विश्वसनीय वृत्त आहे. याबाबत काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

जिल्‍हा परिषदेमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्‍हा परिषदेत शिवसेना पंधरा, काँग्रेसचे अकरा तर राष्ट्रवादीचे बारा सदस्य आहेत. जिल्‍हा परिषदेत सध्या ५१ सदस्य असून बहुमतासाठी सव्वीस सदस्यांची आवश्यकता होती. त्‍यानुसार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येवून सत्ता स्‍थापन केली आहे. मात्र जिल्‍हा परिषदेत मंगळवारी (ता.१३) काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्‍या हाणामारीनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

आज खासदार अॅड. राजीव सातव यांच्‍या उपस्‍थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांच्‍यासह जिल्‍हा परिषद सदस्य स्‍थित होते. यावेळी खासदार अॅड. सातव यांनी काँग्रेसच्‍या सदस्यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना दिल्‍याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. सत्तेत असूनही दादागिरीची भाषा ऐकून घ्यावी लागत असल्‍यानेच सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍याचे सुत्रांनी स्‍पष्ट केले. याशिवाय राष्ट्रवादीच्‍या नेत्‍यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याबाबत सर्व अधिकारी आमदार डॉ. संतोष टारफे यांना देण्यात आल्‍याचे सुत्रांनी सांगितले. त्‍यामुळे पुढील काळात काँग्रेसचे अकरा सदस्य सत्तेतून बाहेर पडणार असल्‍याचे चित्र आहे. त्‍यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी होणार असल्‍याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT