MPSC
MPSC 
पुणे

जागा वाढवूनही एमपीएससीचे विद्यार्थी नाराज

सकाळवृत्तसेवा
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आयोगाच्या परीक्षांसाठी दरवर्षी साधारणत: पाच लाख विद्यार्थी अर्ज करतात. यावर्षी होत असलेल्या परीक्षेतून विविध पदांच्या 69 जागा भरण्यात येणार होत्या. सरकारच्या मागणीनुसार आयोगाने 67 जागा वाढविल्या आहेत. तथापि, ही संख्या कमीच असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, विद्यार्थी आपल्यावरील अन्यायाला "सोशल मीडिया'द्वारे वाचा फोडण्याची मोहीम राबविणार आहेत. सोमवारी (ता. 18) सकाळी 10 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विद्यार्थी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांना ई-मेल करणार आहेत. तसेच मोहिमेचा #MPSC_STUDENTS_RIGHTS हॅशटॅग वापरून ट्‌विट करून संबंधितांना टॅग करणार आहेत.

वाढीव जागांसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन राज्य सरकार 200 ते 300 जागा वाढवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता "सोशल मीडिया'च्या माध्यमातून आवाज उठविणार आहोत.
- महेश बडे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी.

राज्य सरकारच्या किती जागा रिक्त आहेत, याची सांख्यिक माहिती आयोगाकडे नसते. आवश्‍यक असणाऱ्या पदांसाठीची मागणी सरकार आयोगाकडे करते. त्या मागणीनुसार आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते.
- सुनील अवताडे, उपसचिव, राज्य लोकसेवा आयोग

पद व एकूण जागांची संख्या
उपजिल्हाधिकारी (गट अ) - 20
पोलिस उपअधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त (गट अ) - 2
सहाय्यक राज्यकर आयुक्त (गट अ) - 12
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (गट अ) - 6
सहाय्यक संचालक (राज्य वित्त व लेखा सेवा - गट अ) - 8
उद्योग संचालक (तांत्रिक - गट अ) - 2
तहसीलदार (गट अ) - 6
उपशिक्षणाधिकारी (राज्य शिक्षण सेवा - गट ब) - 25
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट ब) - 4
कक्ष अधिकारी - 26
सहायक गट विकास अधिकारी (गट - ब) - 16
उपअधीक्षक (भूमी अभिलेख - गट ब) - 1
उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क - गट ब) - 2
सहाय्यक आयुक्त (राज्य उप्तादन शुल्क - गट ब) - 1
सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी/ गृहप्रमुख/ प्रबंधक (गट ब) - 5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT